वडिलांची संकल्पना मुलाने चालवली, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला मिळाली आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, वार्षिक उलाढाल 70 लाख Video

Last Updated:

अमरावतीमधील भावेश वानखडे यांनी ट्राईब ग्रोन एंटरप्राइजेस ही कंपनी 2023 मध्ये सुरू केली. या माध्यमातून ते महाराष्ट्रासह मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील आदिवासी शेतकऱ्यांना संघटित करून त्यांच्या शेतीमालाला जागतिक स्तरावर बाजारपेठ मिळवून देण्याचे काम करत आहेत. 

+
News18

News18

प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
अमरावती : सध्याचा घडीला तरुणांचा कल हा उच्च शिक्षण घेऊन व्यवसायाकडे आहे. अमरावतीमधील भावेश वानखडे यांनी ही उच्च शिक्षण घेतल्यानंतर ट्राईब ग्रोन एंटरप्राइजेस ही कंपनी 2023 मध्ये सुरू केली. या माध्यमातून ते महाराष्ट्रासह मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील आदिवासी शेतकऱ्यांना संघटित करून त्यांच्या शेतीमालाला जागतिक स्तरावर बाजारपेठ मिळवून देण्याचे काम करत आहेत. हळद, मध, तूप, शेवग्याच्या शेंगांचे पावडर यासारखे आणखी काही नवीन प्रॉडक्ट त्यांनी दुर्गम भागातून परराज्यात सुद्धा पाठवले आहेत. यामुळे आदिवासी बांधवांना सुद्धा चांगला मोबदला मिळत आहे आणि त्यांच्या कलागुणांना वाव सुद्धा मिळत आहे.
advertisement
अमरावतीमधील भावेश वानखडे यांनी बीए मानसशास्त्राची पदवी घेतली त्यानंतर टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून ‘सोशल इंटरप्रिनरशिप’ विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पदव्युत्तर शिक्षणामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागील कारणे काय? याबाबत त्यांनी अभ्यास केला. भावेश वानखडे यांच्याशी लोकल 18 ने संवाद साधला. तेव्हा ते सांगतात की, ट्राईब ग्रोन साठी वापरलेली मूळ संकल्पना ही माझे वडील डॉ. रवींद्र वानखडे यांची आहे. त्यांना नेहमी वाटायचं की, आदिवासी लोक त्यांच्या भागातून शहराकडे येतात आणि वेगवेगळे कामे करतात. त्यातून पाहिजे तसा मोबदला त्यांना मिळत नाही. त्यांनी जे त्यांच्या एरियामध्ये असलेल्या संधीचा योग्य फायदा घेतला तर त्यांचे आयुष्य सुधारण्यास मदत होईल. मात्र, कोरोनामध्ये वडिलांचे निधन झाले.
advertisement
त्यानंतर तीच संकल्पना मी पुढे चालवली. ट्राईब ग्रोन एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी मी 2023 मध्ये सुरू केली. सर्वात आधी आदिवासी बांधवांसोबत जुळलो. त्यानंतर त्यांना ट्रेनिंग देणे सुरू केले. ते सुद्धा काम करत होते पण त्यांच्या कामात व्यवस्थित पणा नव्हता कारण त्यांना साधने उपलब्ध नव्हती. त्यानंतर त्यांना आम्ही ट्रेनिंग दिलेत. त्याचबरोबर अनेक नवनवीन साधन साहित्य उपलब्ध करून दिले. जसे की, ते पिप्यामध्ये मध ठेवत होते. मध चाळण्यासाठी काहीही वापरत होते. त्यांना आम्ही ड्रम उपलब्ध करून दिले. पोळे झाडायला जाताना घालण्यासाठी ड्रेस सुद्धा उपलब्ध करून देण्यात आला. त्यानंतर त्यांचा जो माल दलाल अर्ध्या किंमतीमध्ये घेत होता त्यात त्यांना नफा मिळू लागला. त्यानंतर विविध आयडिया त्यांना दिल्यात. आतापर्यंत आम्ही 5500 आदिवासींना ट्रेनिंग दिलेत. तर 2500 आदिवासीकडून प्रॉडक्ट घेत आहोत.
advertisement
त्यांच्याकडून आता पूर्ण प्रोसेस करून घेऊन तो माल इकडे ब्रॅण्डिंग आणि पॅकिंग साठी घेतला जातो. या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा मागणी आहे. सध्या हळद, तूप, मध आणि मोरींगा पावडर हे प्रॉडक्ट आमच्याकडे आहेत. आतापर्यंत अनेकवेळा विदेशात हे प्रॉडक्ट आम्ही पाठवले आहे. अमरावती वरूनच आम्ही प्रॉडक्ट पाठवत आहोत. यामध्ये आम्हाला सरकार कडून सुद्धा मदत मिळाली आहे. त्यामुळे आमचा छोटा व्यवसाय आता मोठे स्वरूप घेण्याच्या मार्गावर आहे. सध्या आमची वार्षिक उलाढाल 70 ते 90 लाखांपर्यंत जाते.
advertisement
या प्रॉडक्टच्या किंमती आम्ही त्यांच्या गुणवत्तेवरच ठरवल्या आहे. मध हे 700 रुपयांपासून ते 1200 रुपये प्रति किलोपर्यंत आम्ही विक्री करतो. त्यानंतर हळद 400 ते 700 रुपये प्रतिकीलो अशी आम्ही विक्री करतो. त्यानंतर देशी गाईचे तूप हे 1600 रुपयांपासून ते 2500 प्रतिकिलो पर्यंत आम्ही विक्री करत आहोत. याची किंमत ही गुणवत्तेवर ठरवल्या जाते, असे भावेश यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
वडिलांची संकल्पना मुलाने चालवली, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला मिळाली आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, वार्षिक उलाढाल 70 लाख Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement