पांढऱ्या सोन्यावर मोठं संकट, पैठण तालुक्यातील 7 हजार हेक्टर क्षेत्रावर परिणाम
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
शेतकऱ्यांनी महागडी बियाणे, खते, कीटकनाशके वापरून कपाशीचे पीक उभे केले होते. मात्र, दीर्घकाळ पाण्याचा ताण पडल्याने जमिनीचे तापमान वाढले.
छत्रपती संभाजीनगर: सध्या पावसाळा ऋतू असल्यामुळे वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. जुलै महिन्यामध्ये सर्वच ठिकाणी अगदी मुसळधार पाऊस झाला होता. सध्या काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. वातावरणातील बदलांचा सगळ्यात मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसत आहे. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे काही ठिकाणी पिकांवरती रोग पडण्यास सुरुवात झाली आहे. सध्या कपाशी पिकावरती रोग पडण्यास सुरुवात झाल्याने शेतकरी चिंतेमध्ये आहेत.
पैठण तालुक्यात अनेक ठिकाणी कपाशीवर 'मर' (Wilt Disease) रोग पडला आहे. तालुक्यात 55 हजार 600 हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली असून त्यापैकी 7 हजार हेक्टर कपाशीला या रोगाचा फटका बसण्याचा शक्यता निर्माण झाली आहे. मराठवाड्यात मोठ्या खंडानंतर पाऊस झाल्यानंतर ही स्थिती निर्माण झाली आहे. झाडे अचानक सुकू लागली आहेत. फुलं लागण्याआधीच कपाशी मरू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.
advertisement
Ginger Farming: युवा शेतकऱ्याला सापडला पैशाचा फॉर्म्युला, दीड एकरात केली अद्रक शेती, पाहा कमाई किती?
शेतकऱ्यांनी महागडी बियाणे, खते, कीटकनाशके वापरून कपाशीचे पीक उभे केले होते. मात्र, दीर्घकाळ पाण्याचा ताण पडल्याने जमिनीचे तापमान वाढले. अशा वेळी अचानक पाऊस झाल्यास झाडांना धक्का बसतो. त्यामुळे झाडे सुकतात आणि पानगळ होते. पावसानंतर 36 ते 48 तासांत ही लक्षणे दिसू लागली आहेत. त्यामुळे उत्पादनात मोठ्या नुकसानीची शक्यता आहे.
advertisement
जून आणि जुलै महिन्यामध्ये चांगला पाऊस झाला होता. पण, ऑगस्ट महिन्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. हा रोग असाच वाढत राहिला तर आर्थिक फटका बसेल. तज्ज्ञांनी याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
August 08, 2025 7:10 PM IST

