Guess Who : श्रीमंती पायाशी लोळत होती, पण घरातून 26 रुपये घेऊन पळाला अभिनेता, नंतर खाल्ला चपलेचा मार

Last Updated:
चित्रपटसृष्टीत काही कलाकार त्यांच्या नकारात्मक भूमिकांमुळे इतके गाजले की, त्यांची छबी आजही लोकांच्या मनात जिवंत आहे. अशाच एका अभिनेत्याने अभिनय क्षेत्रात विश्वविक्रम नोंदवला आहे.
1/7
मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टीत काही कलाकार त्यांच्या नकारात्मक भूमिकांमुळे इतके गाजले की, त्यांची छबी आजही लोकांच्या मनात जिवंत आहे. अशाच एका अभिनेत्याने अभिनय क्षेत्रात विश्वविक्रम नोंदवला आहे.

advertisement
2/7
विशेष म्हणजे, एका श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंबातून आलेल्या या कलाकाराला अभिनेता होण्यासाठी घरातून पळून यावे लागले. हे अभिनेते म्हणजे, सुप्रसिद्ध कलाकार किरण कुमार यांचे वडील आणि ६०, ७० च्या दशकातील लोकप्रिय खलनायक जीवन.

3/7
अभिनेते जीवन यांचे खरे नाव ओंकार नाथ धर होते. ते त्यांच्या खलनायकी भूमिकांसाठी जितके प्रसिद्ध होते, त्याहून अधिक लोकप्रियता त्यांनी एका पौराणिक भूमिकेतून मिळवली. जीवन यांनी चित्रपटांमध्ये ६१ वेळा 'नारद मुनी' यांची भूमिका साकारली होती. त्यांच्या या अभिनयाच्या विक्रममुळे त्यांचे नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवले गेले आहे.

4/7
जीवन यांचा अभिनेता बनण्याचा प्रवास खूप नाट्यमय होता. त्यांचे आजोबा राज्यपाल होते, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला समाजात मोठा मान होता. प्रतिष्ठित कुटुंबातील मुलगा असल्याने त्यांना अभिनयात काम करण्याची परवानगी मिळाली नाही.

5/7
अभिनयाचे वेड असलेल्या जीवनांनी वयाच्या १८ व्या वर्षी, खिशात फक्त २६ रुपये घेऊन घरातून मुंबईला पळ काढला. जन्म देताना आई वारली, तर ते ३ वर्षांचे असताना वडिलांचेही निधन झाले होते. अशातच वाढत्या वयात त्यांचा अभिनेता बनण्याचा निश्चय दृढ होत गेला.

6/7
जीवन यांनी आपल्या पाच दशकांच्या कारकिर्दीत शेकडो चित्रपटांमध्ये काम केले, पण खलनायकाच्या भूमिकेमुळे त्यांना एकदा भयंकर प्रसंगाला सामोरे जावे लागले. एका कार्यक्रमासाठी ते मुंबईबाहेर प्रवास करत असताना, ट्रेनमधून उतरताच काही महिलांनी त्यांच्या खलनायकी कामावरचा राग व्यक्त केला.

7/7
एका महिलेने थेट चप्पल काढून त्यांच्या तोंडावर फेकली. दुसरी महिलाही चप्पल घेऊन धावली. परिस्थिती इतकी बिघडली की अखेर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आणि त्यांची सुटका करावी लागली. 'नारद मुनी' आणि खलनायक अशा दोन टोकाच्या भूमिका जिवंत करणारे जीवन यांचे १९८७ मध्ये वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement