नोकरी सोडली, अंजीरच्या पिकात घेतलं कांद्याचं अंतरपिक, कमी खर्चात कमवला 3 लाखांचा नफा Video

Last Updated:

महेश सावंत यांचे शिक्षण 12 वी पर्यंत झाले आहे. पुण्यातील एका खाजगी कंपनीतून त्यांनी नोकरी सोडून दिली. आणि वडिलोपार्जित मिळालेल्या जमिनीवर त्यांनी शेती करायचा निर्णय घेतला.

+
अंजीरच्या

अंजीरच्या पिकात घेतला कांद्याचा अंतर पिक; दोन ते तीन लाखाचा झाला नफा; अंजीर मधून

इरफान पटेल, प्रतिनिधी 
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी या गावात प्रथमच शेतकरी महेश शिवाजी सावंत यांनी अंजीरची लागवड केली आहे. या अंजीरची लागवड करून त्यामध्ये कांद्याचा आंतरपीक घेतले आहे. अंजीर लागवडीसाठी जवळपास 70 ते 80 हजार रुपये खर्च आला आहे तर कांदा लागवडीसाठी 20 ते 30 हजार रुपये खर्च आला आहे. यामधून त्यांना 2 ते 3 लाखांचा नफा झाला आहे.
advertisement
महेश शिवाजी सावंत यांचे शिक्षण 12 वी पर्यंत झाले आहे. पुण्यातील एका खाजगी कंपनीतून त्यांनी नोकरी सोडून दिली. आणि वडिलोपार्जित मिळालेल्या जमिनीवर त्यांनी शेती करायचा निर्णय घेतला. पुरंदर येथे जाऊन अंजीर विषयी माहिती घेऊन महेश सावंत यांनी दीड एकरात अंजीरची लागवड केली असून ती बाग आठ महिन्यांची आहे.
advertisement
महेश यांनी अंजीरची लागवड दीड एकरात 18 बाय 18 वर केली आहे. तसेच अंजीरच्या बागाला जास्त पाणी लागत नाही. अंजीरची बाग लागवडीसाठी मुरमाळ आणि खडखाड जमिनीची आवश्यकता असते. कारण काळ्या जमिनीवर अंजीरची बाग येत नाही कारण पाणी जर साचत असेल तर अंजीरच्या बागेला पाणी चालत नाही. अंजीरवर पावसाळ्यात तांबेरा नावाचा रोग येतो पण तो रोग फवारणी करून आटोक्यात आणू शकतो.
advertisement
अंजीरला सध्या पुणे आणि मुंबईमध्ये 70 ते 80 रुपये किलो दर मिळत आहे. सध्या बाजारात अंजीरला मागणी खूप आहे पण उत्पादन कमी आहे. अंजीरची लागवड एकदा केल्यास 25 वर्ष पर्यंत उत्पादन घेऊ शकतो. महेश सावंत यांनी पुन्हा अंजीर या व्हरायटीच्या अंजीरची लागवड केली आहे. तसेच या पुन्हा अंजीरवर प्रक्रिया करून अंजीर जॅम, अंजीर चॉकलेट अंजीर पासून विविध प्रोडक्शन आपण करू शकतो.
advertisement
अंजीरची लागवड करण्यासाठी महेश यांना 70 ते 80 हजार रुपये पर्यंत खर्च आला आहे. तर या अंजीरच्या बागेत आंतरपीक म्हणून कांद्याची लागवड करून त्यांनी अंजीर बागेचा खर्च तसेच कांदा लागवडीचा खर्च वजा करून 2 ते 3 लाख रुपये पर्यंतचे उत्पन्न घेतले आहे. तर अंजीर विक्रीच्या माध्यमातून शेतकरी महेश सावंत यांना लाखो रुपयांचा नफा मिळणार असल्याची ही माहिती त्यांनी दिली आहे. तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता ज्यांच्याजवळ मुबलक शेती आहे. त्या तरुणांनी शेतीत वेगवेगळे प्रयोग करून शेती करावी आणि कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न कसे घेता येईल याकडे लक्ष द्यावे, असा सल्ला महेश सावंत यांनी दिला आहे.
मराठी बातम्या/कृषी/
नोकरी सोडली, अंजीरच्या पिकात घेतलं कांद्याचं अंतरपिक, कमी खर्चात कमवला 3 लाखांचा नफा Video
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement