Pomegranate Farming: संकट आली, खंबीर पाय रोवत जोपासली डाळिंब बाग, आता मिळणार 5 लाख उत्पन्न, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
डाळिंब बागेवर आलेल्या विविध संकटांमुळे एक वेळ डाळिंब बाग उखडून काढण्याची वेळ या शेतकऱ्यावर आली होती. नव्याने तयारी करत एक एकर डाळिंब बाग या शेतकऱ्याने फुलवली आहे.
जालना: क्षेत्र कोणतेही असो, त्यामध्ये अडीअडचणी, समस्या येतातच. परंतु कठीण काळातही जो तग धरून उभा राहतो तोच शेवटी यशाच्या उंच शिखरावर पोहोचतो. जालना जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याने हे सिद्ध करून दाखवले. डाळिंब बागेवर आलेल्या विविध संकटांमुळे एक वेळ डाळिंब बाग उखडून काढण्याची वेळ या शेतकऱ्यावर आली होती. नव्याने तयारी करत एक एकर डाळिंब बाग या शेतकऱ्याने फुलवली आहे. या माध्यमातून 5 ते 6 लाखांचे उत्पन्न या शेतकऱ्याला अपेक्षित आहे.
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आलमगाव ही प्रल्हाद येळेकर यांचे गाव आहे. 2010 ते 17 पर्यंत त्यांच्याकडे डाळिंबाची बाग होती. परंतु डाळिंब बागेवर येत असलेल्या तेल्या आणि अन्य रोगांचा प्रादुर्भाव आणि बाजारात मिळत असलेला अत्यल्प भावामुळे त्यांनी अनेक वर्ष जोपासलेली डाळिंब बाग उखडून काढली.
advertisement
परंतु 2022 मध्ये पुन्हा एकदा एक एकर क्षेत्रावर भगवा जातीच्या डाळिंबाची 14 बाय आठ या अंतरावर लागवड केली. 35 रुपयांना एक याप्रमाणे 300 रोपे एका एकरमध्ये लावण्यात आली. या डाळिंब बागेतून त्यांना मागील वर्षी दोन टन उत्पन्न झालं. एक लाख दोन हजार रुपये प्रति टन एवढा भाव मिळाला. यावर्षी 5 ते 6 टन उत्पन्नाची अपेक्षा येळेकर यांना आहे. बाजारात डाळिंबांना 120 ते 130 रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे. शंभर रुपये प्रति किलो या दराने जरी डाळिंबाची विक्री झाली तरी देखील त्यांना 5 ते 6 लाखांचे उत्पन्न मिळणार आहे.
advertisement
डाळिंब बागेत खत व्यवस्थापन आणि फवारणी व्यवस्थापन नीटपणे करणं गरजेचं असतं. बाकी इतर अंतर मशागत फारशी करावी लागत नाही. कोणत्याही पिकामध्ये संयम फार आवश्यक असतो. यंदा 5 ते 6 टन डाळिंबाचे उत्पादन अपेक्षित असून यापासून 5 ते 6 लाख रुपये उत्पन्न होईल, अशी अपेक्षा येळेकर यांनी लोकल 18 शी बोलताना व्यक्त केली.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Jun 20, 2025 10:02 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Pomegranate Farming: संकट आली, खंबीर पाय रोवत जोपासली डाळिंब बाग, आता मिळणार 5 लाख उत्पन्न, Video






