advertisement

Farmer Scheme: शेतकऱ्यांसाठी फायद्याची योजना, अर्ध्या किमतीत मिळतेय कामाची वस्तू, लगेच करा अर्ज

Last Updated:

Farmers Scheme: शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी आहे. केवळ अर्ध्या किमतीत शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी वस्तू मिळत आहे.

Farmer Scheme: शेतकऱ्यांसाठी फायद्याची योजना, अर्ध्या किमतीत मिळतेय कामाची वस्तू, लगेच करा अर्ज
Farmer Scheme: शेतकऱ्यांसाठी फायद्याची योजना, अर्ध्या किमतीत मिळतेय कामाची वस्तू, लगेच करा अर्ज
जालना : शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत असतात. अनेक शेतकरी या योजनांच्या माध्यमातून शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करून आर्थिक उन्नती देखील करतात. अशीच एक योजना  राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना फवारणीसाठी आवश्यक असणाऱ्या स्प्रे पंपासाठी सरकारकडून 50 टक्के अनुदान देण्यात येत आहे. यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रांसह महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे बंधनकारक असणार आहे.
लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड होऊन शेतकऱ्यांना पंप खरेदी करावा लागेल. पंप खरेदी केल्यानंतर राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर 50 टक्के अनुदान जमा करण्यात येईल. या योजनेसाठी महाडीबीटीवर अर्ज करावा लागतो. अर्ज केल्यानंतर लॉटरी पद्धतीने निवड होऊन शेतकऱ्यांना मोबाईलवर संदेश जातो. सध्या बॅटरी संचलित स्प्रे पंप वापरण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे श्रम व वेळेत बचत होत आहे.
advertisement
आवश्यक कागदपत्रे
या योजनेच्या लाभासाठी महाडीबीटीवर अर्ज करावा लागतो. सोबत सातबारा, आधारकार्ड, आधार लिंक बँक खात्याची माहिती, जात प्रमाणपत्र आदी कागदपत्रे लागतात. संबंधित शेतकरी महाराष्ट्रातील रहिवासी असावा. त्यांनी यापूर्वी स्प्रे पंप योजनेचा लाभ घेतलेला नसावा. जाती प्रवर्गातील शेतकरी असतील तर त्यांनी अर्ज करताना प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
advertisement
गतवर्षी 12 हजार 320 शेतकऱ्यांना लाभ
गतवर्षी शासनाने जाहीर केलेल्या 100 टक्के अनुदान योजनेतून 12 हजार 320 जणांना लाभ देण्यात आला. यंदा 50 टक्के अनुदानावर स्प्रे पंप योजना सुरू आहे. त्यासाठी गरजू शेतकऱ्यांनी महाडीबीटीवर कागदपत्रांसह अर्ज करावा असा आवाहन जालन्याचे जिल्हा कृषी अधीक्षक गहिनीनाथ कापसे यांनी केला आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Farmer Scheme: शेतकऱ्यांसाठी फायद्याची योजना, अर्ध्या किमतीत मिळतेय कामाची वस्तू, लगेच करा अर्ज
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement