कृषी समृद्धी योजनेचा ५,६६८ कोटींचा निधी आला, कोणत्या घटकाला किती पैसे मिळणार?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : राज्यातील शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत उत्पादनक्षमतेत वाढ करण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबई : राज्यातील शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत उत्पादनक्षमतेत वाढ करण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या विकासाला गती देण्यासाठी 'कृषी समृद्धी योजना' राबविण्यात येणार असून या योजनेतून शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्रे आणि ट्रॅक्टर चलित रुंद सरी वरंब (बीबीएफ) यंत्रांसाठी अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने पुढील तीन वर्षांसाठी तब्बल ५,६६८ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय कृषी विभागाने जारी केला आहे.
४ घटक कोणते?
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, ''या योजनेत शेतीचे आधुनिकीकरण, पाणी साठवण, अचूक शेती तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकऱ्यांना सामूहिक सुविधा उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट आहे;;. कृषी समृद्धी योजनेत चार प्रमुख घटकांचा समावेश करण्यात आला आहे.
ट्रॅक्टर चलित रुंद सरी वरंब (बीबीएफ) यंत्र
वैयक्तिक शेततळे
शेतकरी सुविधा केंद्रांची उभारणी
advertisement
मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन योजना
कोणत्या घटकाला किती निधी?
या चारही घटकांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी वाटप करण्यात आले आहे. शासन निर्णयानुसार, २५ हजार बीबीएफ यंत्रांसाठी १७५ कोटी, १४ हजार वैयक्तिक शेततळ्यांसाठी ९३ कोटी, शेतकरी सुविधा केंद्र उभारणीसाठी ५ हजार कोटी आणि ५ हजार ड्रोनच्या वितरणासाठी ४०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
advertisement
राज्यभरात २५ हजार बीबीएफ यंत्रांचा पुरवठा केला जाणार असून प्रत्येक यंत्र दर हंगामात सुमारे १०० हेक्टर क्षेत्रावर काम करण्यास सक्षम असेल. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे अंदाजे २५ लाख हेक्टर क्षेत्रावर सुधारित पद्धतीने शेती करता येईल. बीबीएफ यंत्रामुळे पिकांची मुळे मजबूत राहतात, निचरा सुधारतो आणि पाण्याचा कार्यक्षम वापर होतो, त्यामुळे उत्पादन वाढण्यास हातभार लागेल.
advertisement
ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापरावर विशेष भर देण्यात आला आहे. मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन योजना अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानित दरात ड्रोन मिळणार असून या माध्यमातून खत आणि कीटकनाशकांची फवारणी अधिक कार्यक्षम व सुरक्षित पद्धतीने करता येईल. यामुळे शेती खर्चात बचत होऊन उत्पादन खर्च कमी होईल.
वैयक्तिक शेततळ्यांमुळे शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता वाढेल आणि पावसाच्या अनिश्चिततेतही शेती करणे सोपे होईल. तर शेतकरी सुविधा केंद्रांद्वारे आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण, बी-बियाणे, यंत्रसामग्री आणि इतर शेतीसंबंधित सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 09, 2025 10:19 AM IST


