दिलासादायक! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक बोनस, प्रक्रिया अंतिम टप्प्यात
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : शेतकऱ्यांसाठी बोनस वितरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. एकूण 1 लाख 35 हजार 13 शेतकरी या योजनेत पात्र ठरले आहेत.
गोंदिया : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी बोनस वितरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. एकूण 1 लाख 35 हजार 13 शेतकरी या योजनेत पात्र ठरले आहेत. त्यापैकी 1 लाख 28 हजार 563 शेतकऱ्यांना तब्बल 242 कोटी 98 लाख 35 हजार रुपये अदा करण्यात आले आहेत. मात्र,अजूनही 6 हजार 650 शेतकऱ्यांना 15 कोटी 71 लाख 77 हजार रुपये देणे बाकी असल्याची माहिती समोर आली आहे.
बोनस वितरणातील प्रगती
गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या बोनससाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना बोनसची रक्कम वितरित झाली असली, तरी काही शेतकरी तांत्रिक कारणांमुळे या प्रक्रियेतून वंचित राहिले आहेत.
पणन अधिकारी विवेक इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 4,500 शेतकऱ्यांची नावे भीम पोर्टलवर ब्लॉक झाली आहेत. यामागे मुख्य कारण म्हणजे सातबारा उताऱ्यातील क्षेत्रफळ कमी-जास्त असणे. त्यामुळे बोनस वितरणाची प्रक्रिया अडथळ्यात आली आहे.
advertisement
तहसीलदारांचा पाठपुरावा
या समस्येवर उपाय म्हणून तहसीलदारांशी सातत्याने चर्चा आणि पाठपुरावा सुरू आहे. सुधारित यादी तयार करून ती भीम पोर्टलवर पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. सुधारित यादी पाठविल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांची थकबाकी बोनस रक्कम लवकरच त्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.
शेतकऱ्यांना दिलेला सल्ला
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला देण्यात आला आहे. पिक विमा योजनेंतर्गत क्षेत्रफळाची नोंदणी करताना नेहमी अचूक माहिती द्यावी. चुकीची किंवा जास्त क्षेत्रफळ दाखविल्यास सातबारामध्ये विसंगती निर्माण होते आणि त्याचा परिणाम बोनस, अनुदान किंवा विमा रक्कम मिळण्यावर होतो.
advertisement
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पाऊल
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बोनसची मोठी रक्कम आधीच वितरित झाल्याने बहुसंख्य शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच हक्काची रक्कम मिळणार असल्याने त्यांच्यातही समाधानाचे वातावरण आहे. तहसीलदार आणि महसूल विभागाच्या संयुक्त प्रयत्नामुळे हा प्रश्न निकाली निघेल, अशी अपेक्षा आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 13, 2025 11:44 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
दिलासादायक! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक बोनस, प्रक्रिया अंतिम टप्प्यात