जंगली प्राण्यांकडून पीकं, पाळीव पशूंचे नुकसान झाल्यास सरकार किती आर्थिक मदत देतं? अर्ज कुठे करायचा?

Last Updated:

Agriculture News : राज्यातील शेतकरी दरवर्षी वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीमुळे मोठ्या संकटाला सामोरे जातात. यंदाही वाघ, बिबट्या, रानडुक्कर, नीलगाय, हरिण, हत्ती, अस्वल, रानगवा, माकड यांसह इतर वन्यप्राण्यांमुळे हजारो हेक्टरवरील पिके आणि पशुधनाचे नुकसान झाले आहे.

agriculture news
agriculture news
मुंबई : राज्यातील शेतकरी दरवर्षी वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीमुळे मोठ्या संकटाला सामोरे जातात. यंदाही वाघ, बिबट्या, रानडुक्कर, नीलगाय, हरिण, हत्ती, अस्वल, रानगवा, माकड यांसह इतर वन्यप्राण्यांमुळे हजारो हेक्टरवरील पिके आणि पशुधनाचे नुकसान झाले आहे. या संघर्षामुळे काही शेतकरी जखमी होतात, तर काही वेळा जीव गमावावा लागतो. राज्य सरकारने अशा नुकसानीसाठी भरपाईची तरतूद केली आहे. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांनी ठरावीक वेळेत अर्ज करणे आणि आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.
पिकांचे नुकसान झाल्यास प्रक्रिया
शेतकऱ्यांनी जर पिकांचे नुकसान झाल्याचे आढळले, तर 72 तासांच्या आत संबंधित वनक्षेत्रपालाकडे नमुना 3 मध्ये अर्ज करणे आवश्यक आहे. या अर्जावर आधारित वनरक्षक, कृषी सहाय्यक आणि तलाठी यांची समिती पंचनामा करून अहवाल तयार करते. हा अहवाल 10 दिवसांत वनक्षेत्रपालाकडे सादर करावा लागतो. त्यानंतर भरपाई ठरवली जाते. पिकांच्या भरपाईत नुकसानीची टक्केवारी, त्या गावातील मागील पाच वर्षांची उत्पादकता आणि हमीभाव यांचा विचार केला जातो.
advertisement
उदा. जर कापसाचे एकरी उत्पादन सरासरी 8 क्विंटल असेल आणि 10 गुंठे क्षेत्रातील पिकाचे 100% नुकसान झाले, तर शेतकऱ्याला हमीभावानुसार नुकसानभरपाई मिळते. 8 हजार रुपये हमीभाव गृहीत धरल्यास 2 क्विंटलचे नुकसान 16 हजार रुपयांची भरपाई दिली जाते.
भरपाईचे दर
20 हजारांपर्यंत नुकसान : पूर्ण भरपाई (किमान 2 हजार रुपये).
20 हजारांपेक्षा जास्त नुकसान : 20 हजार अधिक त्यावरील 80% भरपाई, जास्तीत जास्त 50 हजार मर्यादा.
advertisement
ऊस पिकासाठी : 1600 रुपये प्रतिटन, 500 हजार मर्यादा.
फळझाडांसाठी : केळी – 240 रुपये प्रतिझाड, आंबा व संत्री झाडे – वयाप्रमाणे 500 ते 7000 रुपये, नारळ – वयाप्रमाणे 500 ते 9500 रुपये.
मानवी जीवितहानी झाल्यास भरपाई
जर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला तर कुटुंबाला 25 लाख रुपये मिळतात. कायमचे अपंगत्व आल्यास 7.50 लाख रुपये, गंभीर जखमी झाल्यास 5 लाख रुपये, तर किरकोळ जखमी झाल्यास औषधोपचाराचा खर्च किंवा जास्तीत जास्त 50 हजार रुपये भरपाई दिली जाते. मात्र, जर व्यक्तीने वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन केले असेल तर भरपाई मिळत नाही.
advertisement
पशुधनाची हानी झाल्यास भरपाई
गाय,म्हैस किंवा बैल मृत्यू : बाजारभावाच्या 75% किंवा 70 हजारांपर्यंत.
मेंढी, शेळी मृत्यू : बाजारभावाच्या 75% किंवा 15 हजारांपर्यंत.
अपंगत्व आल्यास : बाजारभावाच्या 50% किंवा 15 हजारांपर्यंत.
जखमी पशुधन : उपचाराचा खर्च, कमाल 5 हजार रुपये.
अर्ज भरताना शेतकऱ्यांनी घटनास्थळ बदलू नये, कारण पुरावा महत्त्वाचा असतो. पंचनाम्यानंतर वनविभागाकडून अहवाल सादर होतो आणि साधारणतः एका महिन्यात भरपाई दिली जाते.
advertisement
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा मुद्दा
जर अर्ज सादर करून 30 दिवसांपेक्षा उशीराने भरपाई मिळाली, तर शेतकऱ्याला भरपाईसोबत 6% व्याज मिळण्याचा नियम आहे. म्हणून, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे झालेल्या पिकांचे, पशुधनाचे किंवा मानवी जीवितहानीचे नुकसान शेतकऱ्यांनी नियमबद्ध प्रक्रियेनुसार तात्काळ कळवणे आणि अर्ज करणे आवश्यक आहे. यातून त्यांना योग्य वेळी आणि न्याय्य भरपाई मिळू शकते.
मराठी बातम्या/कृषी/
जंगली प्राण्यांकडून पीकं, पाळीव पशूंचे नुकसान झाल्यास सरकार किती आर्थिक मदत देतं? अर्ज कुठे करायचा?
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement