Ration Card : ....अन्यथा रेशन कार्डमधून तुमचं नाव होणार कमी! कारण काय? जाणून घ्या
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Ration Card e-KYC : सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक पारदर्शक बनवण्यासाठी आणि फक्त पात्र लाभार्थ्यांनाच रेशनचा लाभ मिळावा यासाठी रेशनकार्डधारकांसाठी ई-केवायसी (E-KYC) प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. पुरवठा विभागाने या प्रक्रियेची अंतिम तारीख 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे.
अमरावती : सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक पारदर्शक बनवण्यासाठी आणि फक्त पात्र लाभार्थ्यांनाच रेशनचा लाभ मिळावा यासाठी रेशनकार्डधारकांसाठी ई-केवायसी (E-KYC) प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. पुरवठा विभागाने या प्रक्रियेची अंतिम तारीख 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे.
ई-केवायसी न केल्यास होईल नुकसान
जर लाभार्थ्यांनी या मुदतीत ई-केवायसी पूर्ण केली नाही, तर त्यांच्या रेशनकार्डवरील नावे रद्द केली जातील आणि त्यांना सरकारी रेशन मिळणार नाही. अमरावती जिल्ह्यात सध्या 3,74,335 रेशनकार्डधारकांना सरकारी धान्य पुरवठा केला जात आहे. बोगस कार्डधारकांना रोखण्यासाठी पुरवठा विभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत.
advertisement
ई-केवायसी प्रक्रिया कशी करावी?
लाभार्थ्यांना त्यांच्या नजीकच्या रेशन दुकानातील पॉस (POS) मशीनद्वारे ई-केवायसी करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी पुरवठा विभागाने गेल्या दोन वर्षांपासून सतत प्रयत्न केले आहेत. अद्याप 32.65% लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.
प्रमुख ई-केवायसी अपूर्ण असलेले क्षेत्र कोणते?
अचलपूर - 76,456, तहसील - 40,153, मोर्शी - 36,363, अंजनगाव - 35,702, भातकुली - 28,797, चांदूर रेल्वे - 17,224, चांदूर बाजार - 61,330 चिखलदरा - 34,938, दर्यापूर - 31,664, धामणगाव रेल्वे - 28,736, धारणी - 59,399, नांदगाव खंडेश्वर - 18,333, तिवसा - 28,152, वरुड - 42,642, आणि अमरावती एफडीओमध्ये 1,35,668 लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया अद्याप पूर्ण केलेली नाही.
advertisement
ई-केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
आधार कार्ड
शिधापत्रिका (रेशन कार्ड)
ई-केवायसीचे महत्त्व काय?
ई-केवायसीद्वारे आधार क्रमांकाच्या आधारे लाभार्थ्यांची ओळख व पत्त्याची पडताळणी होते. यामुळे बोगस नोंदी टाळता येतात. शिधापत्रिकेत नमूद असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे सत्यापन करणे आवश्यक आहे. सत्यापन न झाल्यास संबंधित व्यक्तीचे नाव रेशनकार्डमधून वगळले जाईल, ज्याची सर्वस्वी जबाबदारी लाभार्थ्यांची असेल. लाभार्थ्यांनी अंतिम तारखेपूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून रेशनपुरवठा कायम ठेवावा, असे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 09, 2025 10:47 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
Ration Card : ....अन्यथा रेशन कार्डमधून तुमचं नाव होणार कमी! कारण काय? जाणून घ्या









