'दशावतार'नंतर कोकणातील संकासूराचा थरार, अंकुश चौधरी-प्राजक्ता माळीच्या 'देवखेळ'चा ट्रेलर
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Devkhel Trailer : सुपरस्टार अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या मुख्य भूमिका असलेली 'देवखळ' ही मराठी वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. देवखेळचा पहिला ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.
कोकणातील दशावतार प्रेक्षकांच्या भेटीला आला. दशावतार सिनेमानं प्रेक्षकांची मनं जिंकली. कोकणातील जमिनीचा विषय दशावतार या सिनेमाच्या माध्यमातून मांडण्यात आला. या सिनेमाच्या निमित्तानं कोकणातील दशावताराचा खेळही सातासमुद्रापार पोहोचला. दशावतारनंतर आता कोकणातील संकासूराचा थरार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
मराठीतील सुपरस्टार अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या मुख्य भूमिका असलेली 'देवखळ' ही मराठी वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. देवखेळचा पहिला ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या सीरिजच्या निमित्तानं प्रेक्षकांना पुन्हा एकदा कोकणातील एक नवीन लोककलाप्रकार, तसंच कोकणाचं निसर्ग सौंदर्य पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे.
( अशोक मामांची ऑनस्क्रिन मुलगी अडकली विवाहबंधनात, आशीर्वाद द्यायला थेट मामाच पोहोचले मंडपात, PHOTO 3 )
advertisement
मराठी ZEE5 ने आज त्याच्या आगामी मराठी ओरिजनल सिरीज Devkhel (देवखेळ)चा ट्रेलर रिलीड केला. कोकणातील फारशा ऐकिवात नसलेल्या लोककथांपासून प्रेरित, देवखेळ हा एक गहन सायकोलॉजिकल थ्रीलर आहे. जो शिमगा (होळी) सणाच्या भीतीदायक पार्श्वभूमीवर परंपरा, अंधश्रद्धा आणि गुन्हेगारी यांची सरमिसळ करतो.
रत्नागिरी जिल्ह्यातील देवताली किनारपट्टीवरील गावावर आधारित, देवखेळ एका थरारक रहस्यावर आधारित आहे- दरवर्षी होळी पौर्णिमेच्या रात्री, एखाद्याचा मृत्यू होतो. हे मृत्यू न्यायाचे प्रतीक म्हणून स्थानिक पातळीवर पूजल्या जाणाऱ्या शंकासुर या पौराणिक लोककथा व्यक्तिरेखेनेने दिलेल्या दैवी शिक्षेची कृत्ये आहेत, असा गावकऱ्यांचा विश्वास आहे.
advertisement
ट्रेलरमध्ये अशा जगाची झलक दाखवण्यात आली आहे, जिथे श्रद्धा तर्कशक्तीवर मात करते. भीती ही शांततेला अधोरेखित करते आणि सत्य विधीत दडलेले असते. जेव्हा इन्स्पेक्टर विश्वास सरंजामे गावात येतो, तेव्हा तो अंधविश्वासाला स्पष्टीकरण म्हणून स्वीकारण्यास नकार देतो. ही काळजीपूर्वक लपवून केलेली हत्या असल्याचे त्याचे मत असते. त्याचा तपास सुरू करतो. या मालिकेत इन्स्पेक्टर विश्वास सरंजामेच्या भूमिकेत अंकुश चौधरी असून प्राजक्ता माळी, यतीन कार्येकर, अरुण नलावडे, वीणा जामकर आणि मंगेश देसाई यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
advertisement
देवखेळ हा कोकणी लोककथेत रुजलेला हा चित्तवेधक सायकोलॉजिकल क्राइम थ्रीलर आहे. 30 जानेवारी रोजी ZEE5 वर रिलीज होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 21, 2026 6:40 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'दशावतार'नंतर कोकणातील संकासूराचा थरार, अंकुश चौधरी-प्राजक्ता माळीच्या 'देवखेळ'चा ट्रेलर









