Republic day parade: यंदा प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर 'गणपती बाप्पा मोरया' ची गर्जना, महाराष्ट्राच्या चित्ररथाचा PHOTO आला समोर
- Published by:Sachin S
Last Updated:
यंदाच्या वर्षी कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष होणार आहे. येत्या प्रजासत्ताक दिनी आत्मनिर्भर ‘गणेशोत्सव’चा महाराष्ट्राचा चित्ररथ अवतरणार आहे.
प्रशांत लीला रामदास, प्रतिनिधी
नवी दिल्ली: दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने नवी दिल्लीत राजपथावर अर्थात कर्तव्यपथावर प्रत्येक राज्याकडून चित्ररथ सादर केला जात असतो. यंदाच्या वर्षी कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष होणार आहे. येत्या प्रजासत्ताक दिनी आत्मनिर्भर ‘गणेशोत्सव’चा महाराष्ट्राचा चित्ररथ अवतरणार आहे.
७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कर्तव्यपथावर कोणत्या राज्याकडून चित्ररथ कसा तयार केला जाणार आणि सादरीकरण काय करणार, याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्राकडून यावेळी खास असा चित्ररथ साकारला जाणार आहे.
advertisement
‘गणेशोत्सव – आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ ही थीम यावेळी महाराष्ट्राची असणार आहे. लोकमान्य टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची महाराष्ट्रात सुरुवात केली. याचीच आधुनिक झलक यावेळी चित्ररथातून पाहण्यास मिळणार आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथात यंदा गणेशोत्सवाचं दर्शन घटना आहे.

मूर्तिकार, सजावट कलाकार, ढोल-ताशांमधून रोजगार साखळीचं दर्शनही या चित्ररथातून होणार आहे. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’चा प्रभावी संदेश या चित्ररथातून देण्यात येणार आहे.
advertisement
मागील वर्षी काय होता महाराष्ट्राचा चित्ररथ?
दरवर्षी कर्तव्यपथावर महाराष्ट्राकडून वेगवेगळा विषयावर चित्ररथ सादर केला जात असतो. मागील वर्षी २०२५ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी महाराष्ट्राच्या चित्ररथाची थीम ही 'महाराष्ट्रातील गड-किल्ले आणि छत्रपती शिवाजी महाराज' यावर आधारित होते. या चित्ररथातून महाराष्ट्राच्या वैभव आणि शिवरायांच्या गड-किल्ल्यांच्या संवर्धनाची माहिती दिली होती.
महाराष्ट्राच्या चित्ररथाने अनेक वेळी सर्वोत्कृष्ट चित्ररथचा मानही पटकावला आहे. मात्र, केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाद्वारे रोटेशन पद्धतीने दर वर्षी प्रजासत्ताक दिनाला राज्यांची निवड केली जात असते. २०२०, २०१६ आणि २०१३ मध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला संधी मिळाली नव्हती. त्यावरून बराच वाद झाला होता.
Location :
Delhi,Delhi
First Published :
Jan 21, 2026 6:38 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Republic day parade: यंदा प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर 'गणपती बाप्पा मोरया' ची गर्जना, महाराष्ट्राच्या चित्ररथाचा PHOTO आला समोर










