Krushi Market: मक्याचे दर भुईसपाट! कांदा, सोयाबिनला रविवारी किती मिळाला भाव?
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Krushi Market: राज्यातील कांदा, सोयाबीन आणि मका मार्केटमध्ये मोठ्या घडामोडी दिसल्या. दर आणि आवक याबाबत जाणून घेऊ.
मुंबई: राज्यातील कांदा, सोयाबीन आणि मका मार्केटमध्ये मोठ्या घडामोडी दिसत आहेत. रविवारी राज्यातील महत्त्वाच्या बाजारपेठांत या पिकांच्या दरात मोठे चढ-उतार दिसले. मका दरांची घसरगुंडी कायम राहिली असून कांदा आणि सोयाबीन दरांतही फारशी तेजी दिसली नाही. 30 डिसेंबर रोजी मका, सोयाबीन आणि कांद्याची आवक आणि मिळालेल्या दरांबाबत जाणून घेऊ.
मका दराची घसरगुंडी कायम
राज्याच्या कृषीमार्केटमध्ये आज एकूण 573 क्विंटल मक्याची आवक झाली. यापैकी छत्रपती संभाजीनगर मार्केटमध्ये 319 क्विंटल सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 1375 ते जास्तीत जास्त 1475 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. तसेच अमरावती मार्केटमध्ये आवक झालेल्या 254 क्विंटल मक्यास 1420 ते 1565 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
कांद्याची उच्चांकी आवक
राज्याच्या मार्केटमध्ये 45 हजार 773 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 15130 क्विंटल सर्वाधिक आवक पुणे बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 533 ते 1533 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. तसेच सातारा मार्केटमध्ये आवक झालेल्या 206 क्विंटल कांद्यास सर्वसाधारण 1500 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
सोयाबीन आवकेत मोठी घट
राज्याच्या मार्केटमध्ये 924 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी बुलढाणा मार्केटमध्ये 600 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 4200 ते 4400 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. तसेच लातूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 111 क्विंटल पिवळ्या सोयाबीनला प्रतीनुसार 4330 ते 4660 रुपये प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
Nov 30, 2025 7:55 PM IST








