Success Story: पावसाने कंबरडं मोडलं, पण मेहनीतने सावरलं; सोलापूरच्या शेतकर्याने सांगितला यशाचा अचूक फॉर्म्युला!
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
अभिनव संकल्पना घेऊन सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी गावातील एका शेतकऱ्यानं सिद्ध करून दाखवलं आहे. काकडीची शेती करून शेतकरी महिन्याकाठी सध्या लाखोचं उत्पन्न कमावत आहे.
शेती करायची म्हटलं तरीही अनोख्या पद्धतीने शेती करून लाखोंचे उत्पन्न कमावता येते. काही वेगळी संकल्पना घेऊन बाजारात उतरणे गरजेचे असते. अशीच अभिनव संकल्पना घेऊन सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी गावातील एका शेतकऱ्यानं सिद्ध करून दाखवलं आहे. काकडीची शेती करून शेतकरी महिन्याकाठी सध्या लाखोचं उत्पन्न कमावत आहे. शेतकऱ्यानं शेतीतून आपली आर्थिक उन्नती साधली आहे. पारंपारिक शेतीकरून लाखोंचं उत्पन्न कमावणारा हे शेतकरी कोण आहे, जाणून घेऊया...
काकडी लागवडीतून सुद्धा अधिकाधिक उत्पन्न घेता येते. हे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी गावातील शेतकरी महादेव श्रीधर गायकवाड यांनी सिद्ध करून दाखवले आहे. एका एकरात दोन महिन्यांपूर्वी काकडीची लागवड होती. यासाठी त्यांना 60 हजार रूपये इतका खर्च आला होता. तर या काकडीच्या विक्रीतून दोन महिन्यात 80 ते 1 लाख रुपयांचे उत्पन्न महादेव गायकवाड यांना मिळाला आहे. त्यांनी 'लोकल 18' ला दिलेल्या मुलाखतीत शेतीची मशागत कशी केली? याबद्दल सांगितले आहे. जाणून घेऊया...
advertisement
महादेव गायकवाड म्हणाले की, "काकडीची ही भिलीची व्हरायटी आहे. शेतीमध्ये नांगर फिरवून आणि रोटरी मारून आम्ही काकडीच्या बिया टाकल्या. एकूण 10 हजार बिया आम्ही संपूर्ण शेतात टाकल्या आहेत. सहा ते सव्वा सहा एकरात आम्ही शेतीची मशागत केली आहे. पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. परंतु आम्ही किटकनाशक औषधांची फवारणी मारून शेतावर पडणाऱ्या किटकांचा नायनाट केला. दोन दिवसांच्या अंतराने आम्ही काकडीवर औषध फवारतोय. खरंतर काकडीला प्रत्येक दोन दिवसांनी औषध फवारावं लागतंच."
advertisement
पुढे शेतकरी महादेव गायकवाड म्हणाले की, "गेल्या दोन महिन्यांपासून मी शेतीत काकडीची मशागत करतोय. दोन महिन्यांमध्ये 60 हजार रूपयांपर्यंतचा खर्च आला आहे. गेल्या एक महिन्यापासून काकडीची तोड सुरू आहे. आतापर्यंत 10 वेळा आम्ही तोडलेली आहे. जसा पिकाला मार्केटमध्ये भाव मिळतो, त्याप्रमाणेच भाव मिळतो. 9 ते 10 टनामध्ये आम्हाला लाखो रूपयांचा नफा झाला आहे. अजूनही काही प्रमाणात नफा बाकी आहे, तो सुद्धा लवकरच भरून निघेल. खरंतर, काकडी पिक खूप चांगलं आहे, पण त्यासाठी शेतकऱ्याला फार मेहनत घ्यावी लागते. "
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Nov 30, 2025 5:38 PM IST
मराठी बातम्या/Success Story/
Success Story: पावसाने कंबरडं मोडलं, पण मेहनीतने सावरलं; सोलापूरच्या शेतकर्याने सांगितला यशाचा अचूक फॉर्म्युला!







