सावधान! पुढील 24 तासांत पाऊस हाहाकार माजवणार, मुंबईसह 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर

Last Updated:

Maharashtra Weather Update : राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला असून पुढील 24 तास अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यांसह अनेक जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

maharashtra rain update
maharashtra rain update
मुंबई : राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला असून पुढील 24 तास अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यांसह अनेक जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतही उद्या म्हणजेच 24 जुलै रोजी मुसळधार पावसाचा इशारा देत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
राज्यभरात पावसाची तीव्रता वाढणार
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात पावसाचं स्वरूप आणखी तीव्र होणार असून किनारपट्टीपासून विदर्भापर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
जिल्हानिहाय हवामान अलर्ट
गुरुवार, 24 जुलै 2025
रेड अलर्ट: रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई शहर व उपनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर घाटमाथा
advertisement
ऑरेंज अलर्ट: ठाणे, पुणे, सातारा
येलो अलर्ट: कोल्हापूर, सांगली, पालघर, नाशिक, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा
शुक्रवार, 25 जुलै 2025
रेड अलर्ट: रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग
ऑरेंज अलर्ट: ठाणे, मुंबई, नागपूर, भंडारा
येलो अलर्ट: पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर
शनिवार, 26 जुलै 2025
ऑरेंज अलर्ट: रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, मुंबई, नाशिक, पालघर, गडचिरोली
advertisement
येलो अलर्ट: पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर
मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट
मुंबई शहर व उपनगरात आज दिवसभर पावसाची संततधार कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागानुसार, उद्यापासून पावसाचा जोर आणखी वाढेल. त्यामुळे मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जलभराव व वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
advertisement
कोकणात अतिवृष्टीची शक्यता
रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये उद्या अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे या तीनही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी 100 मिमीहून अधिक पावसाची नोंद होण्याची शक्यता असून नदीकाठच्या भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. प्रशासन सतर्क असून मदत यंत्रणा तयार ठेवण्यात आली आहे.
advertisement
विदर्भ व मराठवाड्यातही पावसाचा इशारा
विदर्भ आणि मराठवाड्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज याठिकाणी येलो अलर्ट असून पुढील चार दिवस जोरदार सरींचं आगमन होणार आहे. नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोलीसारख्या जिल्ह्यांतही पावसाचा जोर वाढण्याचा इशारा देण्यात आलाय.
मराठी बातम्या/कृषी/
सावधान! पुढील 24 तासांत पाऊस हाहाकार माजवणार, मुंबईसह 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement