Farmer Success Story : तरुणाचा नाद खुळा! एक आंबा विकतोय 10,000 रुपयांना, अन् वर्षाला करतोय 50 लाखांची कमाई
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : ‘आंबा’ म्हटलं की आपल्याला आठवतो कोकणचा फळांचा राजा. मात्र, आता हापूसच्या पुढे जाऊन ‘मियाझाकी’ नावाचा एक आगळा-वेगळा आंबा चर्चेचा विषय ठरत आहे.
नांदेड : ‘आंबा’ म्हटलं की आपल्याला आठवतो कोकणचा फळांचा राजा. मात्र, आता हापूसच्या पुढे जाऊन ‘मियाझाकी’ नावाचा एक आगळा-वेगळा आंबा चर्चेचा विषय ठरत आहे. किंमत? तब्बल 10,000 रुपये प्रति आंबा. ही किमया करून दाखवली आहे भोकर तालुक्यातील भोसी येथील नंदकिशोर गायकवाड या प्रयोगशील शेतकऱ्याने. चला तर मग जाणून घेऊ त्याचा हा प्रेरणादायी प्रवास
जपानमधून महाराष्ट्रात
2021 मध्ये पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना नंदकिशोर यांना शेतीत नव्या प्रयोगांबद्दलची आवड निर्माण झाली. एका कृषी प्रदर्शनात जपानच्या मियाझाकी शहरात घेतल्या जाणाऱ्या या दुर्मिळ आंब्याविषयी माहिती मिळाली.त्याच क्षणी त्यांनी ठरवलं ‘मियाझाकी’ची लागवड करायचीच
रोपाची किंमत 6,500 रुपये
गायकवाड यांनी जपानमधून 10 रोपं मागवली. एका रोपाची किंमत होती साडेसहा हजार रुपये. त्यांनी आपल्या शेताची माती तपासून,कमी पाण्यात फळ देणाऱ्या या आंब्याच्या झाडांची काळजीपूर्वक लागवड केली.पत्नी सुमन यांच्या मदतीने झाडांची निगा राखली आणि दोन वर्षांत झाडांना फळधारणा झाली.
advertisement
‘मियाझाकी’ची वैशिष्ट्ये
सुरुवातीला हा आंबा जांभळसर असतो नंतर पिकल्यावर लालसर-केशरी बनतो. त्याची चव अतिशय गोड आहे. हा आंबा खाल्ल्याने बिटा कॅरोटीन, फॉलीक अॅसिड, व्हिटॅमिन A आणि C मुबलक; रोगप्रतिकारक शक्ती वाढते, डोळ्यांची दृष्टी आणि पचनक्रिया सुधारते.
ऑनलाइन विक्री आणि जागतिक ग्राहक
'मियाझाकी'ची विक्री नंदकिशोर गायकवाड फक्त ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून करतात. 'मैंगो कॉम' या वेबसाईटवर त्यांनी आंब्याचे फोटो पोस्ट केले आणि त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. लवकरच सौदी अरेबियातील एक ग्राहक त्यांच्या आमराईला भेट देऊन थेट खरेदी करणार आहे.
advertisement
आमराईतील इतर वाण
गायकवाड यांच्या आमराईत केवळ ‘मियाझाकी’ नव्हे, तर नॅमडॉक माईल, बनाना, कोलंबो, केशर आणि दशहरी यांसारख्या विविध वाणांची झाडे आहेत. या साऱ्या उत्पादनातून दरवर्षी त्यांना सुमारे 50 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते, असे त्यांनी सांगितले.
कृषी प्रदर्शनात कौतुक
नुकत्याच पार पडलेल्या नांदेड कृषी प्रदर्शनात ‘मियाझाकी’ आंब्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याची आगळी रंगछटा आणि चव यामुळे तो ‘हायलाइट’ ठरला.
advertisement
दरम्यान, प्रयोगशीलता आणि चिकाटी यांच्या जोरावर नंदकिशोर गायकवाड यांनी शेतशिवारात ‘सोने पिकवलं’ आहे.‘मियाझाकी’ आंबा ही केवळ एक महागडी फळप्रजाती नसून, भारतीय शेतीत नवे प्रयोग करण्याचा मार्ग आहे. त्यांचा प्रवास इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरतोय.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 06, 2025 5:01 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
Farmer Success Story : तरुणाचा नाद खुळा! एक आंबा विकतोय 10,000 रुपयांना, अन् वर्षाला करतोय 50 लाखांची कमाई