Turmeric Farming: महाराष्ट्रात सेंद्रिय हळदीला शेतकऱ्यांची पसंती! फायदे,बाजारभाव समजून घ्या

Last Updated:
News18
News18
नांदेड : अलीकडच्या काळात नांदेड जिल्ह्यातील शेतकरी सेंद्रिय पद्धतीने हळद उत्पादनाकडे मोठ्या प्रमाणावर वळत आहेत. रासायनिक खतांचा वापर टाळून नैसर्गिक शेतीकडे कल वाढल्याने ना केवळ शेती उत्पादनात शाश्वतता निर्माण झाली आहे, तर हळदीच्या औषधी गुणधर्मामुळे ही पावडर आरोग्यासाठीही वरदान ठरत आहे.
सेंद्रिय शेतीचा वाढता प्रभाव
अर्धापूर, नांदेड, कंधार, लोहा, भोकर, मुदखेड, नायगाव व हदगाव या तालुक्यांतील शेतकरी आपल्या जमिनीपैकी काही भागात हळदीसाठी राखून ठेवतात. हे पीक मेहनत आणि खर्च जास्त मागते, तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हळदीला वाढलेली मागणी पाहता, शेतकऱ्यांनी सेलम, फुले स्वरूपा व आर्दी (मेघालय) वाणांची लागवड सुरू केली आहे.
हळदीचे आरोग्यदायी फायदे
सेंद्रिय पद्धतीने उत्पादित हळदीमध्ये कर्क्युमिनचे प्रमाण अधिक असते. कर्क्युमिन हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असून सूज, त्वचेच्या समस्या, पचन विकार आणि शरीरातील विषारी घटक कमी करण्यास मदत करते. याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सेंद्रिय हळद उपयुक्त मानली जाते. त्यामुळे बाजारात रासायनिक हळदीच्या तुलनेत सेंद्रिय हळदीस अधिक दर मिळतो.
advertisement
शेतकऱ्यांचे अनुभव
शेतकरी गेल्या सात वर्षांपासून सेंद्रिय शेती करत आहेत. त्यांच्या हळदीला नियमित बाजारभावापेक्षा जास्त किंमत मिळते.ते शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठाही स्वतः तयार करतात.
रासायनिकमुक्त हळद शेतीतील अनुभव संपन्न शेतकरी असून ते सेंद्रिय हळदीपासून तयार केलेली पावडर थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. या पावडरला बाजारात सुमारे 20 टक्क्यांनी अधिक भाव मिळतो. अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.
मराठी बातम्या/कृषी/
Turmeric Farming: महाराष्ट्रात सेंद्रिय हळदीला शेतकऱ्यांची पसंती! फायदे,बाजारभाव समजून घ्या
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement