आज PM Kisan चा हप्ता जमा होणार! पैसे आले की नाही? 5 मिनिटांत चेक करा

Last Updated:

PM Kisan 20th Installment : देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस आनंददायक ठरणार आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांच्या वाराणसी येथून पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या 20व्या हप्त्याचे वितरण करणार आहेत.

pm kisan yojana
pm kisan yojana
मुंबई : देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस आनंददायक ठरणार आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांच्या वाराणसी येथून पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या 20व्या हप्त्याचे वितरण करणार आहेत. यानिमित्ताने केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर या योजनेच्या 5व्या वर्धापन दिनाचाही उत्सव साजरा केला जाणार आहे. यावेळी 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांची रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) च्या माध्यमातून जमा केली जाईल.
योजनेचा उद्देश काय?
2019 साली सुरू झालेली ही योजना लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आली. सुरुवातीपासून आजपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 3 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम थेट ट्रान्सफर करण्यात आली आहे. 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना खऱ्या अर्थाने वरदान ठरली आहे.
वर्षाला 6000 रुपये थेट खात्यात
PM-KISAN योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाला दरवर्षी 6000 रुपये मिळतात, जे तीन समान हप्त्यांमध्ये (प्रत्येकी 2000 रुपये) खात्यात जमा होतात. या पैशाचा उपयोग शेतमालाच्या निविष्ठा, बियाणे, खते, पाणी, तसेच घरगुती गरजांसाठी केला जातो.
advertisement
20,500 कोटींचा हप्ता
सरकारच्या माहितीनुसार, या 20 व्या हप्त्यामध्ये एकूण 20,500 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होणार आहेत. ही आर्थिक मदत ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासही हातभार लावेल. विशेष बाब म्हणजे, पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी वाराणसी येथून हप्त्याचे वितरण करत आहेत.
हप्ता स्थिती कशी तपासाल?
तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही, हे तपासण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
advertisement
अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://pmkisan.gov.in त्यानंतर "किसान कॉर्नर" या विभागात जा. "Beneficiary Status (लाभार्थी स्थिती)" वर क्लिक करा.तुमचा नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक भरा.दिलेला कॅप्चा कोड टाका आणि "Get Data" वर क्लिक करा.स्क्रीनवर तुमच्या हप्त्याची माहिती दिसेल
e-KYC अनिवार्य
योजनेचा लाभ मिळवण्यासाठी e-KYC पूर्ण असणे अनिवार्य आहे. जर e-KYC अद्याप केली नसेल, तर CSC सेंटरमध्ये जाऊन किंवा पोर्टलवरून ती पूर्ण करा. अपूर्ण e-KYC असल्यास तुमची हप्ता रक्कम थांबवली जाऊ शकते.
advertisement
हप्ता मिळाला नाही? काय कराल?
जर तुमचे नाव लाभार्थी यादीत नसेल किंवा पैसे आले नसतील, तुमच्या तालुका कृषी कार्यालय किंवा CSC सेंटरमध्ये संपर्क करा. आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून पुन्हा अर्ज करा.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
आज PM Kisan चा हप्ता जमा होणार! पैसे आले की नाही? 5 मिनिटांत चेक करा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement