advertisement

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आणखी एक संधी, नोंदणी सुरू, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

Last Updated:

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये देते. ऑनलाइन नोंदणीमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करता येतो. योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना मदत होते.

पीएम किसान योजना
पीएम किसान योजना
मुंबई : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी आने केलेली एक महत्त्वाची आर्थिक सहाय्य योजना आहे, ज्याद्वारे दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना 6000 रुपये देण्यात येतात. हा निधी तीन हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यावर डीबीटीद्वारे वितरित केला जातो. ज्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यात मदत होते.
पीएम किसान योजनेचे फायदे 
ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या सोयीस्करपणे अर्ज करता येतो.
योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळतो, ज्यामुळे ते शेतीची महत्वाची कामे वेळेवर पार पाडू शकतात.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना या योजनेमुळे त्यांच्या दैनिक गरजा पूर्ण करण्यात मदत होते.
आवश्यक कागदपत्रे कोणती?
ओळखपत्र
आधार कार्ड
जमिनीचा 7/12 उतारा
पत्त्याचा पुरावा
बँक खाते तपशील
advertisement
पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया काय आहे?
सर्वप्रथम तुम्हाला https://pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट दिली आहे. त्यानंतर नवीन शेतकरी नोंदणी 'Farmer Corner' मध्ये जाऊन 'New Farmer Registration'पर्याय निवडा. त्यात वैयक्तिक तपशील भरा जसे की, नाव, राज्य, आणि मोबाईल नंबर प्रविष्ट करा.नंतर पूर्ण नोंदणी फॉर्म भरून नंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
advertisement
दरम्यान, ऑनलाइन नोंदणी शेतकऱ्यांसाठी सर्वोत्तम पर्याय आहे, कारण यामुळे ते सहजपणे आणि लवकर अर्ज करू शकतात. योजनेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य पुरवणे हे आहे, जेणेकरून त्यांचे जीवन काटकसरीने कार्यक्षमतेने चालवता येईल. अशा प्रकारे पीएम किसान योजना भारतीय शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त ठरते.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आणखी एक संधी, नोंदणी सुरू, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
Next Article
advertisement
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार; मालकाचे खळबळजनक विधान, म्हणाला- हळूहळू काढण्यापेक्षा मी एकदाच...
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार
  • सर्वात भयानक काळ सुरू

  • 'क्रूर' निर्णयाने कर्मचारी सुन्न

  • 4,000 कुटुंबांची चूल विझली

View All
advertisement