शेतकऱ्यांची उत्सुकता शिगेला! PM Kisan चा 20 वा हप्ता कधी मिळणार?

Last Updated:

PM Kisan Yojana 20th Installment : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM-KISAN) देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

PM Kisan Yojana 20th Installment
PM Kisan Yojana 20th Installment
मुंबई : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM-KISAN) देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम वर्षभरात तीन समान हप्त्यांमध्ये (प्रत्येकी २,००० रुपये) शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) च्या माध्यमातून जमा केली जाते.
योजनेच्या १९ हप्त्यांपर्यंतची रक्कम सरकारने वेळोवेळी वितरित केली आहे. मात्र, २० व्या हप्त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
शेवटचा हप्ता कधी जमा झाला?
सरकारने शेवटचा म्हणजेच १९ वा हप्ता २४ फेब्रुवारी २०२५ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवला होता. त्यापूर्वीचा १८ वा हप्ता जून २०२४ मध्ये आणि १७ वा हप्ता १८ जून २०२४ रोजी जारी झाला होता. त्यामुळे २० वा हप्ता जून २०२५ मध्ये येण्याची अपेक्षा होती, परंतु जुलै महिन्याचा शेवट जवळ येऊनही कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.
advertisement
योजनेचा उद्देश आणि लाभ
PM-KISAN योजनेचा उद्देश लहान व सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणे हा आहे. योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये मिळतात, जे तीन टप्प्यांमध्ये २,००० रुपयांचे हप्ते म्हणून वितरित केले जातात. शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम थेट व कोणत्याही मध्यस्थाशिवाय जमा केली जाते.
तुमचा हप्ता मिळाला का?
जर तुम्हाला २० वा हप्ता अद्याप मिळालेला नसेल, तर घाबरण्याची गरज नाही. सरकार लवकरच याबाबत अपडेट देऊ शकते. तोपर्यंत शेतकऱ्यांनी पीएम किसान पोर्टलवर नियमितपणे खात्याची स्थिती तपासत राहावी.
advertisement
यादीत नाव कसं चेक करायचं?
https://pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. 'Payment Success' विभागाखालील पिवळ्या 'Dashboard' बटणावर क्लिक करा. तुमच्यासमोर 'Village Dashboard' उघडेल. राज्य, जिल्हा, तालुका आणि पंचायत याची माहिती भरून ‘Get Report’ वर क्लिक करा. नंतर लाभार्थी यादीत तुमचं नाव आहे का ते तपासा.
अफवांना बळी पडू नका
PM किसान योजनेसंदर्भात सोशल मीडियावर अनेक फेक लिंक, मेसेज आणि कॉल्स पसरवले जात आहेत. या सर्व गोष्टींपासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, फक्त pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर आणि @pmkisanofficial या सोशल मीडिया हँडलवर दिलेली माहितीच खरी समजावी.
advertisement
सरकारचं शेतकऱ्यांना आवाहन
शेतकऱ्यांनी कोणतीही अफवा पसरवू नये किंवा त्यावर विश्वास ठेवू नये. २० व्या हप्त्याशी संबंधित अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल, अशी अपेक्षा आहे. तोपर्यंत खात्याची स्थिती आणि पोर्टलवरची माहिती वेळोवेळी तपासावी, असे सरकारने आवर्जून सांगितले आहे.
मराठी बातम्या/कृषी/
शेतकऱ्यांची उत्सुकता शिगेला! PM Kisan चा 20 वा हप्ता कधी मिळणार?
Next Article
advertisement
Bollywood Movies: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
    View All
    advertisement