आवक वाढताच हरभरा दर घसरले, बळीराजा चिंतेत, काय मिळतोय सध्या भाव? Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
हंगामाच्या सुरुवातीला हरभऱ्याला 5 हजार 300 ते 5 हजार 600 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळत होता. मात्र बाजारात हरभऱ्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने दरामध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना : हरभरा पिकाची आवक वाढल्याने दरामध्ये 300 ते 400 रुपये प्रतिक्विंटल एवढी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. हंगामाच्या सुरुवातीला हरभऱ्याला 5 हजार 300 ते 5 हजार 600 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळत होता. मात्र बाजारात हरभऱ्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने दरामध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळत असून सध्या बाजारात हरभऱ्याला 5 हजार 100 ते 5 हजार 300 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळत आहे. तर जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज 5 ते 6 हजार क्विंटल हरभऱ्याची आवक होत आहे.
advertisement
हंगामाच्या सुरुवातीला हरभऱ्याला चांगला दर मिळत होता मात्र आवक वाढल्यानंतर हरभऱ्याच्या दरामध्ये 200 ते 300 रुपयांची घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या बाजारात 5 हजार 150 ते 5 हजार 350 रुपये असा दर हरभऱ्याला मिळत आहे. हार्वेस्टरने काढलेल्या मालाला 100 ते 150 रुपये कमी दर मिळत आहे. हरभऱ्याची दर हे खातील पातळीवर असल्याने यापेक्षा दर कमी होण्याची शक्यता कमीच आहे. मात्र तरी देखील बाजाराच्या स्थितीविषयी अचूकतेने सांगता येणार नाही, असं व्यापारी कुंडलिक पाच फुले यांनी सांगितलं.
advertisement
मी 55 कट्टे हरभरा जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणला होता. हरभऱ्याची काढणी हार्वेस्टरने केलेली असल्याने त्याला 5 हजार 200 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला असून चाळणी करून ती खरेदी केले जात आहे. आठ दिवसा आधी हरभऱ्याची तर 5 हजार 600 ते 5 हजार 700 रुपये प्रतिक्विंटल असे होते. आठच दिवसात 300 ते 400 रुपये दरात घट झाली आहे. शेतकऱ्याला या भावामध्ये हरभरा विकणे परवडत नाही मात्र त्याचा काही इलाजही नसतो, असं दहिफळ येथील शेतकरी ज्ञानेश्वर काळे यांनी सांगितलं.
advertisement
छत्रपती संभाजीनगरीतील एका शेतकऱ्याने त्याच्या दोन एकर शेतामध्ये हरभरा पिकाची लागवड केली आहे. हरभऱ्याला मिळत असलेला हा दर समाधानकारक नाही मात्र शेतकऱ्यांना हरभरा बाजारात विकण्याशिवाय काहीही पर्याय शिल्लक राहत नाही. अनेक शेतकऱ्यांना दुसऱ्याची देणे द्यावी लागतात. त्यामुळे मिळेल त्या भावात ती याची विक्री करतात. याचाच फायदा व्यापारी वर्ग उचलत असल्यास खंत शेतकऱ्याने व्यक्त केली.
advertisement
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Feb 21, 2025 5:04 PM IST







