Farmer Success Story : रिस्क घेतली अन् यशस्वी झाला! शेतकरी स्ट्रॉबेरी शेतीतून करतोय लाखोंची कमाई
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : कोरडवाहू प्रदेशात अत्याधुनिक शेती करून यश मिळवणे सोपे नाही, मात्र सातारा जिल्ह्यातील सागर रघुनाथ माने या तरुण शेतकऱ्याने थंड हवामानात घेतली जाणारी स्ट्रॉबेरी कोरड्या हवामानात यशस्वीरीत्या उत्पादन करून दाखवली आहे.
सातारा: कोरडवाहू प्रदेशात अत्याधुनिक शेती करून यश मिळवणे सोपे नाही, मात्र सातारा जिल्ह्यातील सागर रघुनाथ माने या तरुण शेतकऱ्याने थंड हवामानात घेतली जाणारी स्ट्रॉबेरीचे कोरड्या हवामानात यशस्वीरीत्या उत्पादन घेऊन दाखवले आहे. दीड एकर क्षेत्रात लागवड करून दरमहा 2.5 ते 3 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवत तो इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
कोरड्या हवामानात स्ट्रॉबेरी शेतीचं आव्हान
स्ट्रॉबेरी हे थंड हवामानात चांगले उत्पादन देणारे पीक मानले जाते. मात्र, सागर माने यांनी आधुनिक शेतीतंत्रांचा वापर करून कोरड्या भागात याची यशस्वी लागवड केली.त्यांनी कृषी तज्ञांशी चर्चा करून योग्य नियोजन, ठिबक सिंचन आणि नैसर्गिक खतांचा वापर केला. त्यामुळे कमी पाण्यातही दर्जेदार उत्पादन घेण्यात त्यांना यश आलं.
advertisement
प्रयोगशील राहिल्यास शेतीत मोठे यश मिळू शकते
सागर माने सांगतात, "शेतीमध्ये नव्या प्रयोगांची भीती बाळगू नये. योग्य व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास कोरड्या भागातही चांगले उत्पादन घेता येते." त्यांच्या यशाने परिसरातील अनेक शेतकऱ्यांना नवी दिशा मिळाली आहे.
लहानशा प्रयोगातून मोठं यश
सप्टेंबर-ऑक्टोबर 2023 मध्ये 20 गुंठे जमिनीवर प्रायोगिक तत्त्वावर स्ट्रॉबेरी लागवड करण्यात आली. केवळ 90 दिवसांत उत्पादन हाती आलं, आणि हा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर 2024 मध्ये लागवडीचं क्षेत्र 60 गुंठ्यांपर्यंत वाढवण्यात आलं.
advertisement
उत्पादन व्यवस्थापन आणि विक्री
ठिबक सिंचन, सेंद्रिय खतं आणि कीटक व्यवस्थापन यामुळे सातत्यपूर्ण उत्पादन राखलं.दर दोन दिवसांनी स्ट्रॉबेरी तोडणी व पॅकिंग केलं जातं. सध्या पुणे, वाशी, सांगली, कोल्हापूर, विटा आणि सातारा या ठिकाणी मोठी मागणी आहे. प्रतिवर्ष 300-350 रुपये प्रति किलो दर मिळत असून, महिन्याला 2.5 ते 3 लाख रुपयांचं उत्पन्न होत आहे.
advertisement
स्थानिकांना रोजगाराची संधी
या यशस्वी प्रयोगामुळे गावातील 8 स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला. त्यांना नियमित तोडणी, पॅकिंग आणि वाहतूक यासाठी काम मिळत आहे.
भविष्यातील योजना
यापुढे स्ट्रॉबेरी लागवड अधिक वाढवून स्ट्रॉबेरी प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा मानस असल्याचे सागर माने सांगतात. त्यांनी केलेला हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी एक नवा मार्ग दाखवणारा ठरत आहे. परंपरागत शेतीसोबतच नाविन्यपूर्ण प्रयोग केल्यास चांगलं उत्पन्न मिळू शकतं, हे त्यांच्या यशावरून सिद्ध होतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 11, 2025 2:37 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Farmer Success Story : रिस्क घेतली अन् यशस्वी झाला! शेतकरी स्ट्रॉबेरी शेतीतून करतोय लाखोंची कमाई