Agriculture : गावशिवारात सहज मिळणाऱ्या शेणखताला सोन्याचा भाव, शेतकरी करतोय वर्षाला 4 लाखांची उलाढाल, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
शेतकऱ्यांना शेणखताचे महत्त्व समजल्याने शेतकरी आता रासायनिक खताच्या ऐवजी शेणखताचा वापर शेतात करत आहेत. यामुळे शेणखताच्या दरात वाढ झाली आहे.
सोलापूर - शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन, दूध, म्हशी विक्री करण्याचा व्यवसाय करतात. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना शेणखताचे महत्त्व समजल्याने शेतकरी आता रासायनिक खताच्या ऐवजी शेणखताचा वापर शेतात करत आहेत. यामुळे शेणखताच्या दरात वाढ झाली आहे. पूर्वी 1 हजार ते दीड हजार रुपये ट्रॅक्टर-ट्रॉली या दराने शेणखत मिळत होते, सध्या 3 हजार ते 4 हजार रुपये ट्रॅक्टर-ट्रॉली शेणखत मिळत आहे. या विक्रीतून शेतकरी गणेश सोनकडे वर्षाला लाखोंची कमाई करत आहेत.
सोलापूर शहरापासून 6 किलोमीटर अंतरावर गणेश सोनकडे यांची श्री हनुमान दूध डेअरी आहे. गणेश सोनकडे यांच्या गोठ्यात 70 ते 80 मुर्रा जातीच्या म्हशी आहेत. या म्हशीपासून दररोज 250 ते 300 लिटर दूध विक्री केली जाते. म्हशी पासून मिळणाऱ्या शेणाचाही शेणखत विक्री केला जात आहे.
advertisement
रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपिकता घसरत चालली आहे. म्हणून आता शेतकरी राजा सेंद्रिय शेती, जैविक शेती करण्यावर भर देत आहेत. त्यासाठी शेतकरी मुख्यतः शेणखताचा वापर करत आहेत. मात्र, यांत्रिकीकरणामुळे गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्यांची पशुधनात होणारी घट यामुळे शेणखताला सध्या सोन्याचा भाव आला आहे.
advertisement
सोलापुरात सध्या एक ब्रास शेणखत 3 ते 4 हजार रुपयांना विकले जात आहे. काही वर्षांपासून पशुधनाची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे गावशिवारात सहज मिळणाऱ्या शेणखताला आता सोन्याचा भाव आला आहे. पूर्वी एक हजार ते दीड हजार रुपये ट्रॅक्टर-ट्रॉली या दराने शेणखत मिळत होते, ते सध्या 3 हजार ते 4 हजार ट्रॉलीप्रमाणे मिळत आहे. शेणखत विक्रीच्या माध्यमातून गणेश सोनकडे वर्षाला 3 ते 4 लाख रुपयांची उलाढाल करत आहेत.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
May 06, 2025 1:12 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Agriculture : गावशिवारात सहज मिळणाऱ्या शेणखताला सोन्याचा भाव, शेतकरी करतोय वर्षाला 4 लाखांची उलाढाल, Video