Success Story : शेतीतून मिळेना एवढं दूध व्यवसायानं दिलं, महिन्याला 1,50,000 रुपयांचा नफा, पाहा कसा उभा केला व्यवसाय
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
परमेश्वर पाटील यांनी दोन वासरापासून दूध व्यवसायाला सुरुवात केली होती. आज त्यांच्याजवळ 12 गायी असून या व्यवसायातून ते महिन्याला सर्व खर्च वजा करून एक ते दीड लाख रुपयांचा उत्पन्न घेत आहेत.
सोलापूर : सध्याच्या घडीला शेतकरी शेतीला पूरक व्यवसाय करत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील रामहिंगनी गावातील परमेश्वर काशिनाथ पाटील यांनी दोन वासरापासून दूध व्यवसायाला सुरुवात केली होती तर आज त्यांच्याजवळ 12 गायी असून या व्यवसायातून ते महिन्याला सर्व खर्च वजा करून एक ते दीड लाख रुपयांचा उत्पन्न घेत आहेत. या संदर्भात अधिक माहिती परमेश्वर पाटील यांनी दिली आहे.
रामहिंगनी गावातील शेतकरी परमेश्वर काशिनाथ पाटील यांनी सुरुवातीला दूध व्यवसायासाठी दोन वासरे आणले होते. दुधाला भाव व्यवस्थित असल्यामुळे त्यांनी या व्यवसायाकडे लक्ष घातले. आज त्यांच्याजवळ 15 जर्सी गायी आहेत. तर गाईला दररोज मक्का, कडबा, वैरण दिले जाते. सध्या जर्सी दुधाला 40 ते 60 रुपये लिटर भाव मिळत आहे. परमेश्वर काशिनाथ पाटील हे सकाळी 100 लिटर दूध आणि संध्याकाळी 100 लिटर दूध असे एकूण 200 लिटर दूध दररोज विक्री करत आहे. तर सर्व खर्च वजा करून परमेश्वर पाटील यांनी महिन्याला एक ते दीड लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळत आहे.
advertisement
रामहिंगनी गावासह आजूबाजूला असलेल्या गावातील काही व्यापारी आणि ग्राहक परमेश्वरपाटील यांच्याकडून दूध घेऊन जातात. तर परमेश्वर पाटील हे अर्जुनसोंड, आष्टी, मोरवंची, कान्हेरी, खंडाळी आदी गावात दूध विक्री करतात. शेती करत करत शेतकऱ्यांनी पशुपालनाकडे वळून अधिकाधिक उत्पन्न घेता येईल, असा सल्ला पशुपालक शेतकरी परमेश्वर काशीराम पाटील यांनी शेतकऱ्यांना केला आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
May 17, 2025 10:57 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : शेतीतून मिळेना एवढं दूध व्यवसायानं दिलं, महिन्याला 1,50,000 रुपयांचा नफा, पाहा कसा उभा केला व्यवसाय