groundnut price : भुईमूग उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत, दर 50 टक्के घसरले, कारण काय?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
यंदाच्या वर्षी भुईमूग शेंगाचे दर 50 टक्के घसरले आहे. यामुळे शेतकरी रंगनाथ गावडे यांचे एक ते दीड लाख रुपये पर्यंत नुकसान झाले आहे.
सोलापूर - मागील वर्षी उन्हाळी भुईमूग शेंगाला चांगला दर मिळाला होता. म्हणून सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गावातील शेतकरी रंगनाथ गावडे यांनी एका एकरात उन्हाळी भुईमूग शेंगाची लागवड केली होती. यंदाच्या वर्षी भुईमूग शेंगाचे दर 50 टक्के घसरले आहे. यामुळे शेतकरी रंगनाथ गावडे यांचे एक ते दीड लाख रुपये पर्यंत नुकसान झाले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गावातील शेतकरी रंगनाथ गावडे यांनी एका एकरात उन्हाळी भुईमूग शेंगाची लागवड केली होती. उन्हाळी भुईमूग शेंगा लागवडीसाठी रंगनाथ गावडे यांना एकरी 30 ते 35 हजार रुपये पर्यंत खर्च आला होता. तर शेतकरी रंगनाथ गावडे यांना एका एकरातून 40 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
advertisement
मागील वर्षी बाजारात उन्हाळी भुईमूग शेंगाला शंभर रुपये किलो प्रमाणे दर मिळाला होता. तर सर्व खर्च वजा करून गावडे यांना एक ते दीड लाख रुपये पर्यंतचे उत्पन्न एका एकरातून मिळाले होते. तर यंदाच्या वर्षी भुईमुगाची लागवड जास्त झाल्यामुळे दर 50 टक्के खाली घसरले असून बाजारात भुईमूगाला 40 रुपये किलो दर भेटत आहे. एका एकरातून त्यांना 40 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
advertisement
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमूग शेंगाला चांगले दर मिळतील या आशेने मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. मात्र सध्या भुईमुगाचे दर पडल्याने शेतकरी मेटाकुटीला आला असून शासनाने शेतीमालाला किमान दर द्यावा, अशी मागणी शेतकरी राजा सरकारकडे करत आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
May 22, 2025 10:03 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
groundnut price : भुईमूग उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत, दर 50 टक्के घसरले, कारण काय?