दोन्ही डोळ्यांनी अंध, सोन्या बैल राबतोय शेतात, पाहा शेतकरी आणि बैलाची अनोखी कहाणी
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील वाळूज येथे राहणाऱ्या इंद्रसेन मोटे या शेतकऱ्याकडे एक बैल आहे. हा बैल दोन्ही डोळ्यांनी अंध आहे. हा बैल दोन्ही डोळ्यांनी अंध असूनही शेतातील सर्व कामे करत आहे.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर : शेतकरी आपल्या शेतात शेतीकामासाठी बैलांचा वापर करतात. बैल हा शेती कामासाठी महत्त्वाचा घटक आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील वाळूज येथे राहणाऱ्या इंद्रसेन मोटे या शेतकऱ्याकडे एक बैल आहे. हा बैल दोन्ही डोळ्यांनी अंध आहे. हा बैल दोन्ही डोळ्यांनी अंध असूनही शेतातील सर्व कामे करत आहे. त्या बैलाचे नावं आहे सोन्या बैल. गेल्या 15 वर्षापासून इंद्रसेन मोटे हे अंध सोन्या बैलाला सांभाळत आहेत. नेमक या बैलाला काय झाले होते? तो कस काय अंध झाला? याबाबतची अधिक माहिती इंद्रसेन मोटे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली आहे.
advertisement
सोन्या बैल हा दोन्ही डोळ्यांनी 12 वर्षांपासून अंध आहे. शेतामध्ये काम करताना सोन्या बैलच्या दोन्ही डोळ्यांतून पाणी गळत होते. तेव्हा शेतकरी इंद्रसेन मोटे यांनी गावातील पशुतज्ज्ञ डॉ. श्रीहरी शिनगारे यांना दाखवले. सोन्याच्या दोन्ही डोळ्यात मांस वाढल्यामुळे डोळे काढून शस्त्रक्रिया करावी लागल असे सांगण्यात आले. हे एकदाच ऐकताच इंद्रसेन मोटे यांना जबर धक्का बसला. सोन्याच्या प्रेमापोटी ते सावरले, आणि डॉ. शिनगारे,डॉ. सचिन मोटे यांनी सोन्या बैलाचे दोन्ही डोळे काढून यशस्वी शस्त्रक्रिया केली.
advertisement
सोन्या बैल दोन्ही डोळ्यांनी अंध असला तरी शेतातील सर्व कामे करतो. बैलाच्या कामावर इंद्रसेन मोटे यांचे कुटुंब चालत होते. मुला बाळांची शिक्षणही झाली. सोन्या बैलाच्या सहाय्यानं बाहेरचे भाडे करुन कुटुंबाचा खर्च भागवत असल्याची माहिती इंद्रसेन मोटे यांनी दिली.
advertisement
सोन्या का राबतो शेतात?
सोन्याचे दोन्ही डोळे निकामी झाले, पण डॉक्टरांनी त्याच्या आरोग्यासाठी सल्ला दिला. त्याच्या अंगातून सतत पाणी निघायला हवे. अर्थात, त्याला घाम यायला हवा, तरच त्याची तब्येत चांगली राहील, त्याला कामाची सवय ठेवा, असे सांगितले. पण अंध असल्याने तो कितपत आणि कसे शेती काम करणार, पण त्याच्या आरोग्यासाठी ते आवश्यकच होते. त्यामुळे जमेल तसे इंद्रसेन यांनी त्याला उठायला, चालायला शिकवले. दोन डोळे नसतानाही हा बैल बैलगाडीला पेरणीला कोळपणीला चालत आहे, असे प्रत्यक्ष दिसल्यावर शेतकरी येऊन भेट देतात आणि बैलाच्या पाठीवर शबासकीची थाप देतात.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
January 18, 2025 9:08 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
दोन्ही डोळ्यांनी अंध, सोन्या बैल राबतोय शेतात, पाहा शेतकरी आणि बैलाची अनोखी कहाणी