Success Story : 'उमेद'ने जगण्याचं बळ दिलं अन् नांदेडची महिला मजूर यशस्वी उद्योजिका बनली, वाचा प्रेरणादायी यशोगाथा

Last Updated:

Agriculture News : नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातल्या हिप्परगा गावात राहणाऱ्या कविता दत्तात्रय कोटलवार यांनी आपल्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर एक यशस्वी महिला उद्योजिका म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

agriculture news
agriculture news
नांदेड : जिल्ह्यातील कंधार तालुक्यातल्या हिप्परगा गावात राहणाऱ्या कविता दत्तात्रय कोटलवार यांनी आपल्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर एक यशस्वी महिला उद्योजिका म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. पारंपरिक ग्रामीण वातावरणात, बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून त्या केवळ आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी नव्हे, तर इतर महिलांना रोजगार देणाऱ्या व्यवसायिक झाल्या आहेत.
सुरुवातीला कविता यांना कोणतेही स्थिर उत्पन्नाचे साधन नव्हते. त्यांच्या पतीकडेही शासकीय नोकरी नव्हती. दोघांनी मिळून मजुरीच्या कामातून थोडे पैसे जमवून गावात किराणा दुकान सुरू केले. मात्र, या व्यवसायातून फारशी कमाई होत नव्हती. घरखर्च भागवणेही कठीण होत होते.
अशा कठीण परिस्थितीत कविता कोटलवार यांना शासनाच्या ‘उमेद अभियान’ विषयी माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ बचत गटाची स्थापना केली आणि याच गटाच्या माध्यमातून व्यवसायाची वाटचाल सुरू झाली. उमेद अभियानाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी मसाले उत्पादनाचा व्यवसाय सुरू केला.
advertisement
त्यांनी सुरुवातीला खारोडी मसाले, राजगिऱ्याचे लाडू, हळद पावडर, गूळ चहा पावडर यांसारखे पारंपरिक उत्पादने तयार केली. त्यांच्या गुणवत्तेमुळे ही उत्पादने लवकरच प्रसिद्ध झाली. मुंबईच्या महालक्ष्मी सरल प्रदर्शनात सहभाग घेतल्यावर त्यांच्या उत्पादनांना मोठी मागणी मिळू लागली.
आज कविता कोटलवार यांचा मसाल्यांचा ब्रँड राज्यभर पोहोचला आहे. या उद्योगातून त्या स्वतः चांगली कमाई करत आहेत आणि आठ ते दहा महिलांना रोजगारही देत आहेत. एक साधी महिला उद्योजिका बनली आणि इतर महिलांसाठी प्रेरणा ठरली – हीच त्यांच्या यशाची खरी खूण आहे.
advertisement
कवितांचा मजुरीपासून उद्योजकतेपर्यंतचा प्रवास हा ग्रामीण भागातील महिला सशक्तीकरणाचा उत्तम आदर्श ठरतो. त्यांच्या यशोगाथेने ‘इच्छा असेल तर मार्ग नक्की सापडतो’ हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : 'उमेद'ने जगण्याचं बळ दिलं अन् नांदेडची महिला मजूर यशस्वी उद्योजिका बनली, वाचा प्रेरणादायी यशोगाथा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement