पारंपरिक शेतीला दिला फाटा, मित्राचा ऐकला सल्ला अन् केली कांद्याची लागवड, शेतकरी झाला मालामाल
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
शेतकरी सुंदर राठोड यांनी पारंपरिक शेतीत अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्यामुळे शेतीतील नवनवीन प्रयोगांना संधी दिली. त्यांनी कांदा लागवड केली असून वर्षाला लाखोंची कमाई यामधून ते करतात.
प्रशांत पवार, प्रतिनिधी
बीड : कांदा पिकाला बाजारामध्ये मोठी मागणी असते. अश्यातच कांदा उत्पादक शेतकरी आपल्या शेतीमध्ये कांद्याची लागवड करत चांगला नफा कमावत असतात. बीड जिल्ह्यातील मालीपाडगावचे शेतकरी सुंदर राठोड यांनी आपल्या शेतीला एक नवा आयाम देत कांदा लागवडीद्वारे एक यशस्वी शेतकरी होण्याची किमया साधली आहे. पारंपरिक शेतीत अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्यामुळे त्यांनी शेतीतील नवनवीन प्रयोगांना संधी दिली. त्यांनी कांदा लागवड केली असून वर्षाला लाखोंची कमाई यामधून ते करतात.
advertisement
सुरुवात कशी झाली?
सुंदर राठोड यांनी सुरुवातीला कापूस आणि सोयाबीन पारंपरिक पिकांची लागवड केली होती. मात्र या पिकांमुळे उत्पन्नाचे प्रमाण कमी आणि खर्च जास्त होत असल्यामुळे शेतीत उत्पन्न फारसं मिळत नव्हतं. अशा स्थितीत त्यांनी नवनवीन प्रयोग करण्याचा विचार केला. आपल्या एका मित्राच्या सल्ल्यानुसार त्यांनी अर्ध्या एकर एवढ्या क्षेत्रावर कांद्याची लागवड करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या शेतीतील प्रगतीचा मार्ग ठरला.
advertisement
पहिल्या प्रयोगाचे यश
अर्ध्या एकर क्षेत्रात केलेल्या कांदा लागवडीतून सुंदर राठोड यांना अपेक्षेपेक्षा चांगलं उत्पन्न मिळालं. यामुळे त्यांनी याच प्रयोगाचा विस्तार करण्याचे ठरवले. त्यानंतर दीड एकर क्षेत्रात कांद्याची लागवड केली. वाढत्या अनुभवामुळे त्यांची शेतीतली कौशल्ये अधिक प्रगल्भ झाली आणि कांद्याच्या उत्पादनात देखील भरपूर वाढ झाली.
advertisement
वाढता विस्तार आणि निर्णयक्षमता
मागील वर्षी त्यांनी तब्बल दोन एकर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली. त्यावेळी त्यांना तब्बल पाच ते सहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. ही कमाई त्यांच्या मेहनतीचे मूर्त स्वरूप होती. पाच एकरातून यावर्षी त्यांनी अडीच एकर क्षेत्र कांद्याच्या लागवडीसाठी तयार केले आहे. आणि उर्वरित अडीच एकर क्षेत्रावर हळदीची लागवड केली आहे.
advertisement
पाणी व्यवस्थापनातील यशस्वी निर्णय
कांदा लागवडीला भरपूर पाणी लागते पण त्यांच्या विहिरीतील पाणी कमी पडत असल्याने त्यांनी बोअर घेण्याचा निर्णय घेतला. बोअरमधून भरपूर पाणी उपलब्ध झाल्यामुळे कांद्याची योग्य प्रकारे देखभाल करता आली. त्यांच्या या निर्णयामुळे उत्पादन अधिक चांगले झाले.
शेतीतून उद्योजकता
सुंदर राठोड यांनी पारंपरिक पिकांच्या जोडीला जास्त नफा मिळवणाऱ्या पिकांची लागवड सुरू केली. हे करत असताना त्यांनी योग्य वेळेवर योग्य निर्णय घेतले. कमी भांडवलातून सुरू केलेली कांदा लागवड आता एक यशस्वी उद्यम म्हणून उभी राहिली आहे.
Location :
Bid,Maharashtra
First Published :
Dec 27, 2024 4:38 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
पारंपरिक शेतीला दिला फाटा, मित्राचा ऐकला सल्ला अन् केली कांद्याची लागवड, शेतकरी झाला मालामाल








