Mosambi Price: मोसंबी उत्पादकांना दिलासा! प्रति टन 5 हजार रुपयांची वाढ, आगामी काळात काय राहील दराची स्थिती?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
मराठवाड्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मोसंबीच्या दरामध्ये प्रति टन चार ते पाच हजार रुपयांची वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
जालना: मराठवाड्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मोसंबीच्या दरामध्ये प्रति टन चार ते पाच हजार रुपयांची वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आवकेमध्ये झालेली घट आणि उत्तर भारतातून वाढलेली मागणी यामुळे मोसंबीच्या दरात वाढ झाल्याचे सांगितलं जातं. शहरातील मोसंबी बाजारामध्ये मोसंबीला सध्या काय दर मिळतोय? त्याचबरोबर आगामी काळात मोसंबी दराची स्थिती कशी राहील? याबाबत आम्ही जालना येथील मोसंबी अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष नाथा पाटील घनगाव यांच्याकडून माहिती जाणून घेतली पाहुयात.
जालना शहरातील मोसंबी बाजारात सध्या 100 ते 150 टन मोसंबीची आवक दररोज होत आहे. जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून सातत्याने पाऊस होतोय, यामुळे 300 ते 400 टनापर्यंत असलेली आवक शंभर ते दीडशे टणापर्यंत खाली आली आहे. यामुळे दरामध्ये प्रति टन चार ते पाच हजार रुपयांची वाढ झाल्याचे पाहायला मिळतंय. मागील आठवड्यामध्ये मोसंबीचे दर 14 ते 17 हजार रुपये प्रति टन यादरम्यान होते. सध्या मोसंबीला 18 ते 22 हजार रुपये प्रति टन असा दर मिळतोय.
advertisement
परंतु आगामी काळात पावसाने उघडी दिल्यानंतर मोसंबी बाजारात मोसंबीच्या आवकेत मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकते. यामुळे मोसंबीचे दर दबावात येण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोसंबी बाजाराचे गणित लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने मोसंबीची विक्री करावी, जेणेकरून त्यांच्या पदरात योग्य दर पडेल, असे आवाहन नाथा पाटील घनगाव यांनी शेतकऱ्यांना केले.
advertisement
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Aug 20, 2025 2:56 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Mosambi Price: मोसंबी उत्पादकांना दिलासा! प्रति टन 5 हजार रुपयांची वाढ, आगामी काळात काय राहील दराची स्थिती?






