राज्य सरकारचा मोठा निर्णय! रब्बी हंगामासाठी ७८४५ कोटी मंजूर, विभागनिहाय शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार?

Last Updated:

Agriculture News : अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीनंतर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देण्यात आला आहे.

Agriculture News
Agriculture News
मुंबई : अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीनंतर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी (ता. ४ नोव्हेंबर) रब्बी हंगामासाठी ७ हजार ८४५ कोटी रुपयांच्या अनुदानाची मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार असून, हे पैसे पुढील काही दिवसांत थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत, अशी माहिती कृषी विभागाने दिली.
मराठवाडा विभाग
या अनुदानात सर्वाधिक वाटा मराठवाडा विभागाला ४ हजार ४८६ कोटी रुपये मिळणार आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीमुळे या भागात मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले होते.सरकारने आधीच ‘एनडीआरएफ’च्या मदतीव्यतिरिक्त रब्बी पेरणीसाठी प्रति हेक्टर १० हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. आता त्या अनुषंगाने जिल्हानिहाय निधी वाटप करण्यात आला आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगर : ६०८.९५ कोटी
हिंगोली : ३४१.२८ कोटी
नांदेड : ७२७.९३ कोटी
बीड : ७०८ कोटी
जालना : ४६१.५१ कोटी
धाराशिव : ५७७.५४ कोटी
लातूर :५६५.५८ कोटी
परभणी :४९५ कोटी
विदर्भ विभाग
विदर्भ विभागासाठी एकूण २ हजार ५४४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. अतिवृष्टी, कीडरोग आणि पिकांच्या अपयशामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे.
advertisement
अमरावती : १८६.९० कोटी
अकोला : ३२३.४९ कोटी
यवतमाळ : ६३८.१५ कोटी
बुलडाणा : ६१०.५७ कोटी
वाशीम : २७५.३० कोटी
नागपूर : ९२.८१ कोटी
भंडारा : ९.०४ कोटी
गोंदिया : २.५६ कोटी
चंद्रपूर : ११०.३० कोटी
गडचिरोली : १३.२६ कोटी
वर्धा : २८२.३१ कोटी
कोकण विभाग
कोकणातील शेतकऱ्यांसाठीही २९ कोटी रुपयांचे रब्बी अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
advertisement
रायगड :६.०२ कोटी
पालघर :१३.७४ कोटी
ठाणे :९.४८ कोटी
रत्नागिरी :०.२६ कोटी
सिंधुदुर्ग :०.१५ कोटी
पुणे विभाग
पुणे विभागातील एकूण अनुदान सुमारे ७८५ कोटी रुपये आहे.
सोलापूर : ६५२ कोटी
पुणे : २३.३४ कोटी
सांगली : ९९ कोटी
कोल्हापूर : १०.८८ कोटी
शेतकऱ्यांना थेट खात्यात रक्कम
कृषी विभागाच्या माहितीनुसार, या सर्व अनुदानाची रक्कम काही दिवसांत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त भागांतील शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी हा निधी तातडीने वितरित करण्याचे आदेश दिले आहेत.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
राज्य सरकारचा मोठा निर्णय! रब्बी हंगामासाठी ७८४५ कोटी मंजूर, विभागनिहाय शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement