दुष्काळावर मात, गटशेतीला सूरवात! सांगलीच्या तीन शेतकऱ्यांनी ढोबळी मिरचीच्या शेतीतून केली लाखोंची कमाई
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Success Story : दुष्काळी पट्ट्याचा ठसा असलेल्या जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, आधुनिक तंत्रज्ञान, गटशेती आणि नवनवीन प्रयोगांच्या जोरावर शेतीत नवे पर्व सुरू केले आहे. कोंतेवबोबलाद गावातील प्रगतशील शेतकरी दत्तात्रय रामचंद्र जगताप-पाटील यांनी एकरी तब्बल 77 टन ढोबळी मिरचीचे उत्पादन घेत सर्वांचे लक्ष वेधले आहे.
सांगली: दुष्काळी पट्ट्याचा ठसा असलेल्या जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, आधुनिक तंत्रज्ञान, गटशेती आणि नवनवीन प्रयोगांच्या जोरावर शेतीत नवे पर्व सुरू केले आहे. कोंतेवबोबलाद गावातील प्रगतशील शेतकरी दत्तात्रय रामचंद्र जगताप-पाटील यांनी एकरी तब्बल 77 टन ढोबळी मिरचीचे उत्पादन घेत सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यांना मिरचीसाठी 42 रुपये प्रति किलो दर मिळाला असून, एकूण 15 लाख रुपयांचा निव्वळ नफा त्यांनी कमावला आहे.
पहिल्या प्रयोगात नुकसान, दुसऱ्यांदा यश
चार वर्षांपूर्वी, दत्तात्रय जगताप, रमेश जगताप आणि बाबूराव डुबूल यांच्यासह काही शेतकऱ्यांनी पहिल्यांदा ढोबळी मिरचीची लागवड केली होती. मात्र, बाजारभाव न मिळाल्याने त्यांना नुकसान सहन करावे लागले. परंतु यावर्षी त्यांनी पुन्हा आत्मविश्वासाने ढोबळी मिरचीची लागवड केली आणि दुसऱ्याच प्रयत्नात विक्रमी यश संपादन केले.
ढोबळी मिरची दिल्ली, जयपूर, कोलकाता बाजारात
या मिरच्यांचे माल जयपूर, दिल्ली, कोलकाता अशा मोठ्या शहरांच्या बाजारपेठांमध्ये थेट पाठवले जात आहे. व्यापारी मिरची खरेदीसाठी शेतावरच पोहोचत असल्याने वाहतूक व विक्री खर्चातही बचत झाली आहे.
advertisement
गटशेतीचे यशस्वी मॉडेल
गटशेती हा यशाचा किल्ला ठरला. रमेश जगताप, दत्तात्रय जगताप आणि बाबूराव डुबूल या तिघांनी गटशेतीचा प्रयोग करत प्रत्येकी एक एकर क्षेत्रात लागवड केली. एकत्र नियोजन, सल्ला आणि व्यवस्थापन यामुळे उत्पादनात मोठी वाढ झाली.
जगतापांचा शेतकऱ्यांना सल्ला
view comments"परिस्थिती कितीही कठीण असो, योग्य नियोजन, मेहनत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर यश निश्चित आहे. आजच्या काळात शेतीत प्रयोग करणे ही गरज आहे.कारण पारंपरिक पद्धतींनी फारसे साध्य होत नाही," असे दत्तात्रय जगताप यांनी सांगितले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 04, 2025 5:01 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
दुष्काळावर मात, गटशेतीला सूरवात! सांगलीच्या तीन शेतकऱ्यांनी ढोबळी मिरचीच्या शेतीतून केली लाखोंची कमाई


