२०२६ मध्ये ट्रॅक्टर उद्योगाच्या मानकांमध्ये बदल होणार! शेतकऱ्यांना कोणते फायदे मिळणार?

Last Updated:

Tractor News : भारतातील कृषी ट्रॅक्टर आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या नव्या युगात प्रवेश करत आहेत.

tractor news
tractor news
मुंबई : भारतातील कृषी ट्रॅक्टर आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या नव्या युगात प्रवेश करत आहेत. ट्रेम V (TREM V) मानकांच्या अंमलबजावणीमुळे येणाऱ्या काळात देशातील सर्व ट्रॅक्टर CRDi (कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन), ECU (इंजिन कंट्रोल युनिट), DPF (डिझेल पार्टिक्युलेट फिल्टर), SCR (सेलेक्टिव्ह कॅटालिटिक रिडक्शन) आणि EGR (एक्झॉस्ट गॅस रीसर्क्युलेशन) यांसारख्या सॉफ्टवेअर-नियंत्रित सिस्टम आणली जाणार आहे.या सिस्टममुळे प्रदूषणात मोठी घट होईल आणि ट्रॅक्टरची कार्यक्षमता तसेच चालकांचा आराम दोन्ही वाढतील.असं सांगण्यात आले आहेत.
ट्रेम V मानकांनुसार ५० एचपीपेक्षा कमी क्षमतेचे ट्रॅक्टरदेखील आता प्रगत इलेक्ट्रॉनिक नियंत्रण प्रणालींनी सुसज्ज असतील. हे नियम आधीपेक्षा अधिक कडक असल्याने, ट्रॅक्टर उत्पादक, शेतकरी आणि मेकॅनिक सर्वांना नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक असणार आहे.
शेतकऱ्यांना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी लागणार?
DPF रीजनरेशन प्रक्रिया
ट्रॅक्टरच्या डॅशबोर्डवर ‘DPF फुल’ असा अलर्ट आल्यास चालकाने ट्रॅक्टर सुरक्षित ठिकाणी उभे करून फिल्टरमधील काजळी जाळण्याची प्रक्रिया सुरू करावी लागते. ही प्रक्रिया वेळेवर न केल्यास इंजिनचे गंभीर नुकसान होऊ शकते.
advertisement
DEF (AdBlue) चा वापर
SCR सिस्टममध्ये असलेल्या ट्रॅक्टरमध्ये डिझेलसोबत युरिया-आधारित द्रव (AdBlue) वापरावे लागते. ते वेळेवर आणि योग्य प्रमाणात भरणं आवश्यक असतात. चुकीचा किंवा कमी दर्जाचा द्रव वापरल्यास इंजिनची शक्ती कमी होते आणि कार्यक्षमता घटते.
डॅशबोर्डवरील अलर्टवर लक्षं ठेवणे
नव्या ट्रॅक्टरमध्ये ‘चेक इंजिन’, ‘हाय NOx’ आणि ‘DPF’ असे विविध अलर्ट देणारी सिस्टम असणार आहे . प्रत्येकाचा अर्थ आणि त्यावर तात्काळ कोणती कारवाई करावी हे समजून घेणे आवश्यक ठरणार आहे.
advertisement
प्रमाणित इंधनाचा वापर
तसेच सरकारमान्य अल्ट्रा-लो सल्फर डिझेलचाच वापर करणे बंधनकारक असेल. भेसळयुक्त डिझेलमुळे इलेक्ट्रॉनिक सेन्सर खराब होऊ शकतात.
अचूक शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान
प्रिसिजन अॅग्रिकल्चर किंवा अचूक शेती ही भविष्यातील दिशा ठरत आहे. यामध्ये GPS आणि ऑटो गाइडन्स प्रणालीद्वारे ट्रॅक्टर आपोआप सरळ चालतात, ज्यामुळे खते, पाणी आणि कीटकनाशकांचा अचूक वापर होतो. महिंद्राचे DigiSense, जॉन डिअरचे JD Link आणि न्यू हॉलंडचे SkyWatch या प्रणालींनी शेतकऱ्यांना रिअल-टाइम माहिती उपलब्ध करून दिली आहे.
advertisement
दरम्यान, आगामी काळात इलेक्ट्रिक आणि स्वयंचलित (ऑटोनॉमस) ट्रॅक्टर भारतातही दिसतील. हे ट्रॅक्टर शून्य उत्सर्जन करतील आणि मानवी श्रमाची गरज कमी करतील.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
२०२६ मध्ये ट्रॅक्टर उद्योगाच्या मानकांमध्ये बदल होणार! शेतकऱ्यांना कोणते फायदे मिळणार?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement