...तर शेतकऱ्यांना कर्ज घेण्याची गरज पडणार नाही! ठाकरेंनी सरकारला दिला सल्ला
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. ते आजही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पावसानं झालेल्या नुकसानीची पाहणी करत आहेत. यावेळी ते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहेत.
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. ते आजही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पावसानं झालेल्या नुकसानीची पाहणी करत आहेत. या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
योग्य हमीभाव द्या, कर्जाची गरज पडणार नाही
उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. शेतकऱ्यांसाठी आर्थिक पॅकेजची घोषणा करण्यात आली. मात्र त्यांना ती अद्याप मिळाली नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी अजून केली नाही.तुम्ही शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव द्या.त्याला कर्जाची गरज पडणार नाही. असंही ते म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कर्जमाफीच्या आश्वासनाची ऑडिओ क्लिप शेतकऱ्यांना ऐकवली.
advertisement
मी घरी बसून कर्जमाफी केली
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, माझ्या घरी बसण्यावर मोठी टीका झाली.पण मी घरी बसून शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. तुम्हाला शेतातील जास्त कळतं तर तुम्ही शेतात जाऊन उभे रहा.अशी टीका सरकारवर केली आहे.
सरकारकडून ३१ हजार कोटींचे पॅकेजची घोषणा
सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात विशेषत: मराठवाडा विदर्भात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. शेतकऱ्यांच्या पिकासह पशूधनाची मोठी नुकसान झाली आहे. पुराच्या पाण्यामुळे शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. यासाठी सरकारकडून ३१ हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. त्यातून शेतकऱ्यांना टप्प्या टप्प्याखाली आर्थिक मदत करण्यास सरकारकडून सुरुवात झाली आहे.मात्र अनेक शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड नाराजी आहे. तसेच जाहीर झालेली मदत पुरेशी नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
advertisement
तर दुसरीकडे, सोयाबीन, तूर, मका आणि कापूस यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले असून त्यांना रब्बी हंगामासाठी पुन्हा कर्ज घ्यावे लागत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 06, 2025 12:27 PM IST


