कृषी हवामान : मॉन्सून अॅक्शन मोडवर! पुढील 24 तास धोक्याचे, या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Monsoon 2025 : महाराष्ट्रात मान्सूनने सक्रिय प्रवेश केल्यानंतर कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात ठिकठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. मात्र, पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची चिन्हं हवामान विभागाने व्यक्त केली आहेत.
मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने सक्रिय प्रवेश केल्यानंतर कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात ठिकठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. मात्र, पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची चिन्हं हवामान विभागाने व्यक्त केली आहेत. आज, 19 जून रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा व पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसेच, मराठवाडा व विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्यामुळे येलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, कोल्हापूर व नाशिक घाटमाथ्यालाही याच यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे.
साताऱ्यात अतिवृष्टी, ब्रह्मपुरीत तापमान उच्चांकी
18 जूनच्या सकाळपर्यंतच्या 24 तासांत विदर्भातील ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी 37 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. दुसरीकडे, साताऱ्यातील कोयना परिसरात तब्बल 130 मिमी पावसाची नोंद झाली, जी राज्यातील सर्वाधिक ठरली. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा मंदावलेला असला तरी काही भागांत मध्यम ते जोरदार पाऊस कायम आहे.
advertisement
कमी दाबाचे दोन क्षेत्र सक्रिय
गुजरात व परिसरातील कमी दाबाचे क्षेत्र राजस्थानकडे सरकले आहे. पश्चिम बंगाल आणि लगतच्या भागात तयार झालेले दुसरे कमी दाबाचे क्षेत्र आता झारखंडच्या दिशेने सरकत आहे. या प्रणालीमुळे गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम किनारपट्टी आणि पूर्व भारतात ढगांच्या घनतेत वाढ झाली आहे. परिणामी, पुढील काही दिवस पावसाला पोषक हवामान राहणार असल्याचे संकेत आहेत.
advertisement
मान्सूनची घोडदौड सुरूच
view commentsनैकृत्य मोसमी वाऱ्यांनी पुन्हा वेग घेतला आहे. बुधवारी (18 जून) मॉन्सूनने संपूर्ण गुजरात, छत्तीसगड, झारखंड, तसेच मध्य प्रदेश, बिहारचा आणखी काही भाग, राजस्थान आणि पूर्व उत्तर प्रदेशातील काही भाग व्यापले आहेत. येत्या दोन दिवसांत मॉन्सून आणखी प्रगती करणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 19, 2025 9:41 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
कृषी हवामान : मॉन्सून अॅक्शन मोडवर! पुढील 24 तास धोक्याचे, या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट


