advertisement

मळई जमीन म्हणजे काय? तिच्यावर मालकी हक्क मिळवता येते का? ९९ टक्के लोकांना माहीतच नाही

Last Updated:

Agriculture News : नदीमध्ये येणाऱ्या पुरामुळे दरवर्षी नदीचे पात्र थोडेसे बदलत असते. वाहत्या पाण्यासोबत येणारा गाळ, वाळू आणि माती नदीच्या काठावर साचून काही काळात नवीन जमीन तयार होते.

agriculture news
agriculture news
मुंबई : नदीमध्ये येणाऱ्या पुरामुळे दरवर्षी नदीचे पात्र थोडेसे बदलत असते. वाहत्या पाण्यासोबत येणारा गाळ, वाळू आणि माती नदीच्या काठावर साचून काही काळात नवीन जमीन तयार होते. अशा प्रकारे नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या जमिनीला ‘मळई जमीन’ असे म्हटले जाते. मात्र, ही जमीन नेमकी कोणाची, तिची खरेदी-विक्री करता येते का, आणि कायदेशीर नियम काय आहेत, याबाबत नागरिकांमध्ये मोठा संभ्रम दिसून येतो.
मळई जमीन म्हणजे नेमके काय?
मळई जमीन ही नदीच्या पूररेषेजवळ किंवा नदीच्या पात्रात नैसर्गिक प्रक्रियेमुळे तयार झालेली जमीन असते. पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर पाणी ओसरते आणि त्याच वेळी गाळ साचून नवीन भूभाग तयार होतो. ही जमीन कायमस्वरूपी असू शकते किंवा पुढील पूरात पुन्हा वाहून जाऊ शकते. त्यामुळे मळई जमीन ही अस्थिर आणि बदलत्या स्वरूपाची मानली जाते.
advertisement
मळई जमीन कोणाची मालकी?
कायद्यानुसार, नदीचे पात्र आणि त्यालगतची पूररेषेतील जमीन ही सार्वजनिक मालमत्ता मानली जाते. बहुतांश प्रकरणांमध्ये मळई जमीन ही सरकारच्या किंवा महसूल विभागाच्या अखत्यारीत येते. एखाद्या व्यक्तीच्या शेजारी मळई जमीन तयार झाली म्हणून ती आपोआप त्याची मालकी ठरत नाही. मालकी हक्क मिळवण्यासाठी शासनाकडून स्पष्ट मंजुरी आवश्यक असते.
मळई जमिनीची खरेदी-विक्री करता येते का?
साधारणपणे मळई जमिनीची थेट खरेदी-विक्री कायदेशीर मानली जात नाही. कारण.ही जमीन शासकीय किंवा सार्वजनिक मालकीची असते. नदीचे पात्र बदलत असल्याने जमिनीची सीमा निश्चित नसते. पर्यावरण आणि पूरनियंत्रणाच्या दृष्टीने अशा जमिनीवर निर्बंध असतात. महसूल नोंदींमध्ये (७/१२ उतारा, मालमत्ता पत्रक) जर मळई जमीन स्वतंत्रपणे नोंदलेली नसेल, तर तिची नोंदणी करून खरेदी-विक्री करणे बेकायदेशीर ठरू शकते.
advertisement
लागवड किंवा वापर करता येतो का?
काही ठिकाणी स्थानिक प्रशासन तात्पुरत्या स्वरूपात लागवडीस परवानगी देते, मात्र तीही ठराविक अटींवर. कायमस्वरूपी बांधकाम, प्लॉटिंग किंवा व्यावसायिक वापरासाठी मळई जमीन वापरण्यास परवानगी नसते. पूर आल्यास अशी जमीन पुन्हा नदीत विलीन होऊ शकते, त्यामुळे गुंतवणूक धोकादायक ठरते.
नियम तोडल्यास काय होऊ शकते?
परवानगीशिवाय मळई जमिनीवर अतिक्रमण, बांधकाम किंवा विक्री केल्यास
advertisement
अतिक्रमण काढून टाकण्याची कारवाई होते. दंड किंवा कायदेशीर नोटीस पाठवली जाते. नोंदणी रद्द होणे अशा प्रकारच्या कारवाया होण्याची शक्यता असते.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
मळई जमीन म्हणजे काय? तिच्यावर मालकी हक्क मिळवता येते का? ९९ टक्के लोकांना माहीतच नाही
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement