Girl Missing: 10 वर्षांची किरन Ice-Cream घेण्यासाठी बाहेर पडली, 17 वर्षांनी घरी परतली; हरवलेल्या मुलाला AI कसं शोधले?
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Girl Missing: एआयच्या मदतीने पाकिस्तानातील हरवलेली किरन तब्बल 17 वर्षांनंतर आपल्या कुटुंबाच्या मिठीत परत आली. आईस्क्रीम घेण्यासाठी घराबाहेर पडलेली 10 वर्षांची मुलगी तंत्रज्ञानाच्या चमत्कारामुळे पुन्हा आपल्या घराचा रस्ता सापडला.
आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (एआय) काहींच्या दृष्टीने नोकऱ्यांसाठी धोका मानला जातो, तर काहींच्या मते तो काम अधिक सोपे आणि वेगवान करणारे प्रभावी साधन आहे. पाकिस्तानमध्ये AIच्या मदतीने असे एक अद्भुत काम घडून आले, ज्याची कल्पनाही क्वचित कोणी केली असेल. एआयने तिथे एका हरवलेल्या मुलीला तब्बल १७ वर्षांनंतर तिच्या कुटुंबाशी पुन्हा एकत्र आणले.
advertisement
पाकिस्तानातील किरन ही केवळ 10 वर्षांची होती, जेव्हा ती 2008 मध्ये इस्लामाबादमधील आपल्या शेजारातून आईस्क्रीम घेण्यासाठी बाहेर पडली होती. आईस्क्रीम तर मिळाली, पण दुर्दैवाने ती पुन्हा घरी परतलीच नाही.
advertisement
सतरा वर्षांनंतर फेस रिकग्निशन आणि एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने आज 27 वर्षांची झालेली किरन आपल्या घरी परतली आहे. किरन सांगते की ती रस्त्यात हरवली होती आणि रडत होती. त्या वेळी एका दयाळू महिलेनं तिची दया येऊन तिला ईधी फाउंडेशनच्या शेल्टर होममध्ये नेलं, कारण किरनला स्वतःच्या घराचा पत्ता आठवत नव्हता.
advertisement
किरनचे कुटुंबीय पाकिस्तातील पंजाब प्रांतातील कसूर जिल्ह्यात राहतात. तिचा शोध लागल्यानंतर वडिलांना(अब्दुल मजीद)सुरुवातीला या बातमीवर विश्वासच बसला नाही. पोलिसांनी किरनची सगळी माहिती मिळवून तिच्या वडिलांपर्यंत पोहोचवली आणि दोघांची व्हिडिओ कॉलवर बोलणी घडवून आणली. मजीद म्हणाले की त्यांनी अनेक वर्षे आपली मुलगी शोधली, पण ती काही सापडत नव्हती. त्यामुळे अचानक मुलीचा पत्ता लागल्याचं कळताच त्यांना प्रथम धक्का बसला आणि नंतर तीव्र आनंद झाला.
advertisement
ही संपूर्ण प्रक्रिया कशी पार पडली, याबद्दल किरनने सांगितले की तिला ईधी फाउंडेशनच्या शेल्टर होममध्ये पाठवण्यात आले होते. तिथे पंजाब पोलिसांच्या ‘मेरा प्यारा प्रोजेक्ट’ या विशेष उपक्रमाच्या टीमने तिची मुलाखत घेतली. हा प्रोजेक्ट हरवलेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबीयांशी पुन्हा जोडण्याचे काम करतो. किरनच्या अलीकडील छायाचित्रांसोबतच तिच्या बालपणीच्या आठवणींची माहिती टीमनं नोंदवली. शोध घेत असताना टीमला इस्लामाबादमधील एका हरवलेल्या मुलीबाबतची जुन्या काळातील पोलिस तक्रार मिळाली. त्यानंतर एआयच्या फेस रिकग्निशन तंत्रज्ञानाचा आणि इतर ट्रॅकिंग टूल्सचा वापर करून त्या मुलीच्या आणि किरनच्या तपशीलांची जुळवणी करण्यात आली. माहितीची खात्री पटताच किरनला तिच्या खऱ्या घरी पाठवण्यात आलं
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 29, 2025 4:57 PM IST
मराठी बातम्या/AI/
Girl Missing: 10 वर्षांची किरन Ice-Cream घेण्यासाठी बाहेर पडली, 17 वर्षांनी घरी परतली; हरवलेल्या मुलाला AI कसं शोधले?










