राज्यातील कारंजा, जालना, अकोला, यवतमाळ, अमरावती आणि नागपूर परिसरातील बाजारांमध्ये आज दरात वाढती कल दिसून आली. काही बाजारांत आवक अधिक असतानाही दर्जेदार मालाला चांगला भाव मिळाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सोयाबीनची गुणवत्ता, आर्द्रता आणि पांढऱ्या व पिवळ्या जातींनुसार दर निश्चित होत असल्याने दरात तफावत दिसत आहे.
कोणत्या बाजारात किती आवक झाली?
राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये नोंदवलेली सोयाबीनची आवक खालीलप्रमाणे आहे.
advertisement
कारंजा – २०,००० क्विंटल
अमरावती – ७,६६५ क्विंटल
यवतमाळ – २,३८८ क्विंटल
औराद शहाजानी – ३,१०५ क्विंटल
अकोला – ६,३१४ क्विंटल
जालना – १२,१६१ क्विंटल
जळकोट – १,०२० क्विंटल
माजलगाव – १,७१९ क्विंटल
या सर्व बाजारांत एकूण आवक मध्यम ते जास्त पातळीवर होती. कारंजा आणि जालना येथे विक्रमी प्रमाणात माल आला. जालना बाजारात उच्च गुणवत्तेच्या सोयाबीनला अपेक्षेपेक्षा चांगला भाव मिळाल्याचे व्यापाऱ्यांनी नमूद केले.
कालचा दिवस सोयाबीन बाजारासाठी सकारात्मक ठरला. बहुतेक बाजारांत दर स्थिर ते वाढीच्या दिशेने होते. बाजारात सर्वसाधारण सोयाबीनला ४,२०० ते ४,७०० रुपये प्रति क्विंटल या श्रेणीत स्थिर दर. उच्च प्रतीच्या, स्वच्छ व कमी आर्द्रतेच्या सोयाबीनला ५,००० रुपयांपेक्षा अधिक दर मिळाला. पिवळ्या जातीच्या सोयाबीनला सर्वाधिक मागणी असून सर्वाधिक दर मिळाला आहे. अमरावती,माजलगाव आणि कारंजा येथे मोठी आवक झाली, मात्र दर मध्यम राहिले.
येत्या काही दिवसांत दर वाढण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील मोठी उत्सुकता लागली आहे.
