वरूडमध्ये चांगली आवक, 4660 पर्यंत दर
17 नोव्हेंबर रोजी वरूड बाजार समितीत पिवळ्या सोयाबीनची 514 क्विंटल आवक झाली. येथे किमान दर 3700 रुपये, तर कमाल दर 4660 रुपये नोंदवला गेला. सर्वसाधारण दर 4307 रुपये होता, जो मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर मानला जात आहे.
मांढळ मार्केटमध्ये भावात स्थिरता
16 नोव्हेंबर रोजी मांढळ येथे लोकल सोयाबीनची 120 क्विंटल आवक झाली. येथे किमान दर 3450 आणि कमाल दर 4250 रुपये नोंदवले गेले. सर्वसाधारण दर 3800 रुपये असल्याने स्थानिक पातळीवर व्यापार सुरळीत असल्याचे दिसून येते.
advertisement
पैठणमध्ये नगण्य आवक
पैठण बाजारात फक्त 4 क्विंटल आवक झाली. येथे सर्वच सोयाबीन 3900 रुपयांना विकले गेले. कमी आवक असल्यामुळे दरात कोणताही फरक पडला नाही.
शेवगावमध्ये वाढते दर
शेवगाव येथे 50 क्विंटल आवक झाली. किमान दर 3800 आणि कमाल 4100 रुपये नोंदवले गेले. सर्वसाधारण दरही 4100 रुपये असल्याने शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळाल्याचे दिसते.
वरोरा परिसरात मोठे चढ-उतार
वरोरा आणि आसपासच्या बाजारात दर खूपच घटलेले दिसतात.
वरोरा : आवक 35 क्विंटल, किमान दर 1600, कमाल 3800, सरासरी 3500
वरोरा-शेगाव : आवक 220 क्विंटल, किमान फक्त 1500, कमाल 4350, सरासरी 3500
वरोरा-खांबाडा : आवक 67 क्विंटल, किमान 1000, सर्वसाधारण 3200
बुलढाणा जिल्ह्यात मजबूत बाजारी स्थिती
बुलढाणा आणि बुलढाणा-धड या दोन्ही बाजारांमध्ये उत्तम भाव मिळाले. बुलढाणामध्ये आवक 700 क्विंटल, किमान 40000 आणि कमाल 4600 रुपये. सर्वसाधारण दर 4200 रुपये. तर दुसरीकडे बुलढाणा-धड मध्ये आवक 240 क्विंटल, किमान 3700, कमाल 4500 , सरासरी रुपये. येथील दर चांगले असल्यामुळे शेतकरी समाधानी आहेत. उत्पादनाची गुणवत्ता उत्तम आणि मागणी चांगली असल्याने बुलढाण्यातील भाव कायम उंचावलेले दिसत आहेत.
भिवापूरमध्ये भावात मोठी तफावत भिवापूर येथील बाजार भावात मोठी तफावत दिसून आली. आवक 754 क्विंटल असूनही किमान दर फक्त 2100 रुपये तर कमाल दर 4550 रुपये नोंदवला गेला. सर्वसाधारण दर 3328 रुपये आहे. गुणवत्ता नुसार मोठे चढ-उतार असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे.
