आजचा भाव काय?
आज 20 नोव्हेंबरला जळकोट बाजारात पांढऱ्या सोयाबीनची 540 क्विंटल आवक झाली आणि 4555 ते 4821 रुपयांपर्यंत दर मिळाला. सरासरी दर 4700 रुपये होता. सोनपेठमध्ये 172 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली आणि 3900 ते 4500 रुपयांपर्यंत भाव नोंदला. तर काल 19 नोव्हेंबरला येवला, लासलगाव, शहादा, छत्रपती संभाजीनगर आणि राहुरी-वांबोरी इथे 4000 ते 4650 रुपयांच्या आसपास स्थिर दर मिळाले.
advertisement
लासलगाव-विंचूर येथे 960 क्विंटल सोयाबीन बाजारात आले आणि जास्तीत जास्त दर 4751 रुपये राहिला. पाचोरा बाजारात 500 क्विंटल आवक असूनही सरासरी दर 4100 रुपयांवर स्थिर राहिला. कारंजा बाजार समितीत तब्बल 16,500 क्विंटल सोयाबीन दाखल झाले. मोठ्या आवकेनंतरही येथे सरासरी दर 4390 रुपये नोंदला गेला.
सेलू, कन्नड, तुळजापूर, धुळे, सोलापूर आणि अमरावतीमध्ये 4000 ते 4500 रुपयांच्या आसपास दर मिळाल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. नागपूर, जळगाव आणि हिंगोली बाजारातही दर 4400 ते 4700 रुपयांच्या दरम्यान राहिले. कोपरगावमध्ये मात्र 4575 रुपयांचा चांगला दर मिळाला.
जालना आणि अकोला हे बाजार यंदा विशेष चर्चेत राहिले. जालन्यात 11,886 क्विंटल माल बाजारात दाखल झाला आणि सोयाबीनला तब्बल 6000 रुपयांचा सर्वोच्च दर मिळाला. अकोलामध्येही 5400 रुपयांपर्यंत दर नोंदला गेला. खामगाव, चिखली, यवतमाळ, उमरेड, बीड या ठिकाणी 4400 ते 5400 रुपयांदरम्यान दर राहिले.
मंगरुळपीर बाजार समितीत दरात सर्वाधिक तेजी दिसली. येथे 4,440 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आणि सरासरी दर 5650 रुपये होता. या दरामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये मोठा आनंद आहे. तर दर्यापूर, वरूड, वरोरा, भद्रावती, भिवापूर याठिकाणी मात्र किमान दर 1800 ते 3000 रुपयांदरम्यान नोंदला गेला आणि सरासरी भावही 3300 ते 4000 रुपयांपर्यंत मर्यादित होता.
काटोल, सिंदी, राळेगाव, देवणी, उमरखेड, नांदूरा आदी ठिकाणी 4300 ते 4600 रुपयांदरम्यान स्थिर दर मिळाले. काही भागात सोयाबीनची आवक कमी असली तरी दरात खास सुधारणा दिसून आली, तर मोठ्या आवकेच्या बाजारात दरावर दबाव निर्माण झाल्याचे चित्र आहे.
एकूण पाहता, राज्यातील सोयाबीन बाजारात सध्या मोठी चढ-उताराची परिस्थिती कायम आहे. काही ठिकाणी 6000 रुपयांचा उच्चांक नोंदवत सोयाबीनला तेजी मिळत असताना, अनेक बाजार समित्यांमध्ये दर 4000 ते 4500 रुपयांदरम्यान स्थिरावत आहेत.
