TRENDING:

चर्चा तर होणारच! शेतकऱ्याच्या शेतात आले चक्क 8 किलो वजनाचे पानकोबीचे फुल, सर्वांसाठी आश्चर्यकारक

Last Updated:

अमरावतीमधील पथ्रोड येथील शेतकऱ्याच्या शेतात 7 ते 8 किलो वजनाचे कोबीचे फुल आले आहे. सामान्यतः 1 ते 2 किलो वजनाचे कोबीचे फुल सगळ्यांनी बघितले, मात्र 7 ते 8 किलो वजनाचे फुल बघून सर्वत्र चर्चा होत आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
advertisement

अमरावती : अमरावतीमधील पथ्रोड येथील शेतकरी दिनेश हागे हे शेतात गेल्या 3 वर्षापासून केळीसोबतच पानकोबी पिकाची सुद्धा लागवड करतात. या वर्षी त्यांना पानकोबीचे उत्पादन चांगल्या प्रकारे झाले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यावर्षी त्यांच्या शेतात 7 ते 8 किलो वजनाचे कोबीचे फुल बघायला मिळत आहे. त्यामुळे सर्वत्र त्यांची चर्चा होत आहे. सामान्यतः 1 ते 2 किलो वजनाची कोबी आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे हे 7 ते 8 किलो वजनाचे कोबीचे फुल सर्वांसाठी आश्चर्यकारक आहे.

advertisement

पथ्रोड येथील शेतकरी दिनेश हागे यांच्याशी लोकल 18 ने संवाद साधला. तेव्हा ते सांगतात की, गेल्या 3 वर्षांपासून मी शेतात केळी आणि पानकोबीची लागवड करत आहे. यावर्षी जास्तीत जास्त मी सेंद्रिय खताचा वापर केला. त्यामुळे मला चांगलं उत्पन्न झालेलं आहे. माझ्या शेतात टोकिता कंपनीचे डेली बॉल हे वाण मी वापरले आहे.

advertisement

दुहेरी उत्पन्नाचं साधन भारीच, 6 महिन्यात 3 लाख फायदा, शेतकऱ्यानं असं काय केलं?

लागवड कशी केली? 

बेड काढून ड्रिपवर लागवड केली आणि त्याच फळ खूप चांगल्या पद्धतीने मला मिळालेलं आहे. मार्केटमध्ये पाठवलं तेव्हा सर्वजण चकित झाले. कारण इतके मोठ्या वजनाचे फळ कोणी बघितलेले नव्हते. त्याचबरोबर कृषी प्रदर्शनी मध्ये सुद्धा कोणीच इतके मोठे फळ बघितले नव्हते, त्यामुळे आता सर्वत्र याची चर्चा होत आहे. सामान्यतः 1 ते 2 किलो पर्यंत कोबीचे फुल मार्केटमध्ये येतात. माझ्या शेतात 3 ते 8 किलोपर्यंत वजनाचे कोबीचे फुल आलेले आहेत.

advertisement

उत्पन्न किती झाले? 

यासाठी मी जीवामृत आणि शेणखत आणि काही प्रमाणात रासायनिक खत यांचाच वापर केलेला आहे. माझ्या शेतात 15 हजार कोबीचे झाड आहेत, त्यातून मला 40 ते 45 टन इतके उत्पन्न मिळाले आहे. मात्र, भाव मिळाला नाही. भाववाढीची आशा मला होती, पण कमीत कमी दरात मला कोबी विक्री करावी लागली. त्यामुळे थोडी निराशा झाली, असे दिनेश हागे यांनी सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
चर्चा तर होणारच! शेतकऱ्याच्या शेतात आले चक्क 8 किलो वजनाचे पानकोबीचे फुल, सर्वांसाठी आश्चर्यकारक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल