नेमकं काय घडलं?
रॅडिको एन. व्ही. डिसलरीज या मद्य कंपनीमध्ये ही घटना घडली आहे. ही मद्य कंपनी 2008 पासून कार्यरत आहे. कंपनीच्या स्टोअर भागामध्ये 3 हजार टन इतकी मका होती. पत्र्याच्या कोठारामध्ये ही मका साठवून ठेवण्यात आली होती. या टाकीला काही दिवसांपासून गळती लागली होती. ही गळती थांबवण्यासाठी पिडीत लोक हे टाकीची दुरुस्ती करत होते. मात्र अचानक टाकी फुटली आणि ढिगाऱ्याखाली अडकून 4 जणांचा मृत्यू झाला.
advertisement
कामगार, नातेवाईकांचे आंदोलन
या घटनेवरून कामगारांचे नातेवाईक आक्रमक झाले असून त्यांनी कंपनीच्या गेटवर आंदोलन सुरू केले आहे. कंपनीच्या विरोधात घोषणा देत कंपनीवर आरोप केला आहे. तसेच पोलिसांकडून या घटनेची चौकशी सुरू आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
November 16, 2024 8:48 AM IST
