मका दराची घसरगुंडी कायम
राज्याच्या कृषीमार्केट मध्ये आज एकूण 42 हजार, 264 क्विंटल मक्याची आवक झाली. यापैकी नाशिक मार्केटमध्ये 8 हजार, 975 क्विंटल सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 1050 ते जास्तीत जास्त 1665 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच अमरावती मार्केटमध्ये आवक झालेल्या 15 क्विंटल मक्यास 2550 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
कांद्याची उच्चांकी आवक
राज्याच्या मार्केटमध्ये 1 लाख, 51 हजार, 412 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 74 हजार, 476 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 229 ते 1452 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच नाशिक मार्केटमध्ये आवक झालेल्या 1355 क्विंटल कांद्यास सर्वसाधारण 2200 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
सोयाबीनच्या दरात चढ-उतार
राज्याच्या मार्केटमध्ये 41 हजार, 040 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोयाबीनच्या भावात चढ-उतार पहायला मिळाला. लातूर मार्केटमध्ये 12 हजार, 208 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3935 ते 4590 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच नांदेड मार्केटमध्ये आवक झालेल्या 112 क्विंटल पिवळ्या सोयाबीनला सर्वसाधारण 4500 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.





