आधारकार्ड ब्लॉक केले जाणार
पीक विमा योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी जी व्यक्ती बोगस पद्धतीने पीक विमा योजनेचा लाभ घेईल अशा व्यक्तीचे आधारकार्ड ब्लॉक करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव देखील अमरावती आयुक्तालयाकडून कृषी विभागाला पाठण्यात आला आहे.
योजनांच्या लाभापासून वंचित राहणार
मराठवाड्यासह इतर भागामध्ये बनावट पद्धतीने पीक विमा काढणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून आली होती. यावर ठोस कारवाई म्हणून संबंधीत व्यक्तीचे आधार कार्ड हे महाडीबीटीवरुन ब्लॉक करण्यात येईल. तसेच कारवाई झालेल्या व्यक्तीला शासनाच्या इतर योजनांपासून वंचित राहावे लागेल.
advertisement
चांगल्या योजनेला गालबोट
पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत होता. मात्र सातत्याने घडत असलेल्या गैरप्रकारामुळे चांगल्या योजनेला गालबोट लागले आहे.
खरिपात किती बोगस प्रस्ताव?
अमरावती जिल्ह्यात गेल्यावर्षी सहा व्यक्तींच्या नावे फळपीक विम्यात बोगस सहभाग म्हणून आले होते. या प्रकाराची पडताळणी झाली तेव्हा तांत्रिक चूक झाल्याचे समोर आले. मात्र या व्यतिरिक्त मराठवाड्यात मोठ्याप्रमाणात गैरप्रकार घडल्याचे प्रकरणे समोर आले आहेत.
दरम्यान, पीक विमा योजनेवरुन विरोधकांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावर राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी हि योजना बंद न करता अपडेट केली जाईल अशी माहिती दिली आहे.
