धाराशिव: राज्यात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावलीये. धाराशिव जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय. पावसाचं पाणी शेतात साचल्याने पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे अनेक शेतकरी पीक विम्यासाठी विमा कंपनीला पूर्व सूचान देत आहेत. परंतु, हा अर्ज करताना योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे. याबाबत जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी माहिती दिलीये.
advertisement
ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून पिकांचं नुकसान झाला आहे, अशा शेतकऱ्यांनी विमा कंपनीला पूर्व सूचना द्यावी. पूर्व सूचना देताना Heavy Rainfall किंवा Inundation क हा पर्याय निवडावा. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांचे सध्या पंचनामे सुरू आहेत. ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले नाहीत, परंतु ज्यांनी विमा कंपनीला नुकसानीची पूर्व सूचना दिली आहे, अशा शेतकऱ्यांना देखील विम्याची नुकसान भरपाई मिळेल अशी माहिती माने यांनी दिले आहे.
72 तासांच्या आत द्यावी पूर्वसूचना
दरम्यान, पीक विम्याच्या 25 टक्क्यांपेक्षा कमी तक्रारी आल्यास वैयक्तिक पंचनामे केले जातात. त्याहून अधिक तक्रारी आल्यास नमुना सर्वेक्षणानुसार पंचनामे केले जातात. जिल्ह्यात आत्तापर्यंत जवळपास तीन लाख 61 हजार शेतकऱ्यांनी विमा कंपनीला पूर्व सूचना दिली आहे. तर ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत पूर्व सूचना द्यावी, असे कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.