युवा शेतकरी शिवराज मेटकर यांच्याशी लोकल 18 च्या प्रतिनिधीने संवाद साधला. तेव्हा ते सांगतात की, आमच्याकडे गेल्या 7 ते 8 वर्षांपासून नैसर्गिक शेतीवर भर दिला जात आहे. त्यातीलच एक प्रयोग म्हणून माझ्या बाबांनी पंचामृत तयार केलं. ते ताक, चुना, गूळ, तुरटी आणि अंडी वापरून बनवले जाते. त्याचा वापर केल्याने जमिनीची उत्पादन क्षमता सुद्धा वाढते आणि पिकांवर किडींचा प्रादुर्भाव होत नाही. आम्ही गहू या पिकांत सुद्धा तीच फवारणी केली.
advertisement
एकदाच दीडशे झाडांची लागवड, शेतकऱ्यानं मिळवला 15 लाख नफा, असं काय केलं?
शून्य मशागत तंत्राचा वापर
यावर्षी 15 एकरमध्ये नोव्हेंबर महिन्यात आम्ही गहू लागवड केली होती. त्यासाठी अजित आणि लोकन हे दोन आम्ही वापरले. गव्हाची लागवड केल्यानंतर त्यात कोणतेही रसायन वापरलेले नाही. आमच्याकडे पोल्ट्री फार्म असल्याने तेथीलच पोल्ट्री खत आम्ही जमिनीतून गव्हाला दिले. त्यानंतर 4 वेळा पंचामृत स्प्रेइंग केले. सुरुवातीला स्प्रिंकलरने पाणी दिले. या व्यतिरिक्त काहीही वापरले नाही. शून्य मशागत तंत्राचा वापर करून ही गहू लागवड आम्ही केली आहे. यातून चांगले उत्पादन सुद्धा आम्हाला मिळाले आहे. नैसर्गिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतल्याने शेतीमध्ये खूप फायदा होताना दिसून येत आहे. पुढेही शेतीमध्ये असेच नवनवीन प्रयोग आम्ही सुरू ठेवणार आहे, असे शिवराज यांनी सांगितले.





