कपाशीच्या दरात घट
आज राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये कपाशीची एकूण 20 हजार 233 क्विंटल आवक झाली. यामध्ये वर्धा बाजारात 9 हजार 800 क्विंटल कपाशीची सर्वाधिक आवक नोंदवण्यात आली. या ठिकाणी कपाशीला किमान 7 हजार 475 ते कमाल 8 हजार 113 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. दरम्यान, वर्धा बाजारातच 8 हजार 144 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वाधिक बाजारभाव नोंदवण्यात आला. मात्र, एकूणच आज कपाशीच्या दरात घसरण झाल्याचे बाजारातील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
advertisement
Weather Alert: महाराष्ट्रात आता वारं फिरलं, 24 तास महत्त्वाचे! हवामान विभागाकडून अलर्ट
कांद्याच्या दरात वाढ
राज्यात आज कांद्याची एकूण 2 लाख 89 हजार 512 क्विंटल आवक झाली. यामध्ये नाशिक बाजारात 1 लाख 31 हजार 625 क्विंटल लाल कांद्याची सर्वाधिक आवक नोंदवण्यात आली. या बाजारात कांद्याला किमान 364 ते कमाल 1 हजार 255 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. तर अमरावती बाजारात कांद्याला 2 हजार 800 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वाधिक दर मिळाल्याची नोंद आहे. रविवारी नोंदवलेल्या उच्चांकी दराच्या तुलनेत आज कांद्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
सोयाबीनच्या दरात सुधारणा
आज राज्यातील विविध बाजारांत सोयाबीनची एकूण 35 हजार 987 क्विंटल आवक झाली. लातूर बाजारात 9 हजार 395 क्विंटल सोयाबीनची सर्वाधिक आवक नोंदवली गेली. येथे सोयाबीनला किमान 5 हजार 443 ते कमाल 5 हजार 797 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. विशेष म्हणजे, बुलढाणा बाजारात सोयाबीनला 5 हजार 810 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वाधिक बाजारभाव मिळाला असून, रविवारीच्या तुलनेत आज दरात वाढ नोंदवण्यात आली आहे.
तुरीच्या दरातही वाढ
तुरीच्या बाजारातही आज सकारात्मक चित्र पाहायला मिळाले. राज्यभरात तुरीची एकूण 34 हजार 099 क्विंटल आवक झाली. यामध्ये वर्धा बाजारात 8 हजार 196 क्विंटल तुरीची सर्वाधिक आवक नोंदवण्यात आली. येथे तुरीला किमान 7 हजार 717 ते कमाल 8 हजार 653 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. दरम्यान, लातूर आणि वाशिम बाजारात तुरीला 9 हजार 100 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वाधिक बाजारभाव मिळाल्याचे समोर आले आहे. रविवारीच्या तुलनेत आज तुरीच्या दरात वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.





