नोंदणी का आहे अत्यावश्यक?
अवेळी पाऊस, गारपीट, दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शासकीय मदत मिळवण्यासाठी सातबाऱ्यावर पीक नोंद असणे अनिवार्य आहे. ई-पीक पाहणी न केल्यास सातबारा कोरा राहतो आणि विमा दावा करताना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे रब्बी हंगामातील सर्व पिकांची अचूक नोंद वेळेत करणे शेतकऱ्यांच्या हिताचे ठरणार आहे.
advertisement
यंदाही पाऊस धुमाकूळ घालणार? ही वस्तू प्रचंड महागणार, सिद्धेश्वर यात्रेतील वासराची भविष्यवाणी
मेळघाटातील शेतकऱ्यांसाठी विशेष व्यवस्था
मेळघाट हा आदिवासी व दुर्गम भाग असल्याने अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाइल नसणे किंवा तांत्रिक अडचणी येणे स्वाभाविक आहे. अशा शेतकऱ्यांसाठी महसूल विभागामार्फत मदतीची व्यवस्था करण्यात आली आहे. गावातील तलाठी, कोतवाल, नियुक्त मदतनीस तसेच सीएससी (कॉमन सर्व्हिस सेंटर) केंद्रांच्या माध्यमातून ई-पीक पाहणी नोंदणी करून घेता येणार आहे.
ई-पीक पाहणी 2.0.15 ॲपद्वारे स्वयंस्फूर्त नोंदणी
महसूल विभागाने ई-पीक पाहणी 2.0.15 हे अद्ययावत मोबाइल ॲप गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिले आहे. शेतकऱ्यांनी स्वतः शेतात जाऊन पिकाची छायाचित्रांसह माहिती अपलोड करायची आहे. यामुळे सातबाऱ्यावर अचूक नोंद होऊन संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार आहे. 24 जानेवारी ही अंतिम मुदत लक्षात घेता, कोणताही शेतकरी नोंदणीपासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाकडून सातत्याने जनजागृती केली जात आहे.






