मूळचे परभणीचे असलेले शेतकरी चंद्रकांत देशमुख हे गेली अनेक वर्ष झालं आंब्याची शेती करत असून आता जवळपास 55 प्रकारच्या व्हरायटी त्यांच्याकडे आहेत. या आंब्यामध्ये एक आंबा 10 हजार रुपयांना आहे. आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असं हे फळ असल्यामुळे बाजारात मोठी मागणी आहे. 2 एकरमध्ये विविध प्रकारचे आंबे लागवड त्यांनी केली आहेत.
advertisement
Sharad Mango: शेतकऱ्याने पिकवला कलिंगडाएवढा आंबा, शरद पवाराचं दिलं नाव अन् पेटंटही मिळालं!
गेली 14 वर्ष झालं केसर आंब्याचे उत्पादन घेत आहे. परंतु केसर आंबा हा उशिराने सुरू होतो. त्यामुळे त्याला भाव भेटत नाही. वातावरणामुळे नुकसान देखील होतं. याला पर्याय म्हणून जो आंबा बाजारात लवकर येऊन त्याचा देठ सशक्त असेल असा आंबा निवडून तो चांगला नफा मिळवून देऊ शकतो. भारतातील 28 प्रकारच्या व्हरायटी लावल्यानंतर हा परिणाम जाणवला नाही. इंटरनॅशनल एक्सिबिशन बांगलादेश, सिंगापूरला गेल्यानंतर जगातील सगळ्या व्हरायटी जमा केल्या त्या जवळपास 55 व्हरायटी आहेत. त्यामधल्या 10 व्हरायटी या लवकर येतात. कमीत कमी 500 रुपयांपासून पासून हे आंबे मिळतात. तर एक आंबा 10 हजार रुपयांना देखील आहे,असं शेतकरी चंद्रकांत देशमुख सांगतात.
मिया झाकी हा जगातील सगळ्यात सुंदर आंबा असून त्याचा TSS 15 आहे. अँटी कॅन्सर आणि मिनरल्स असलेला हा आंबा असल्यामुळे भारतात एक आंबा 10 हजार रुपये तर जपानमध्ये 2 लाख 40 हजार रुपये किलोचा दर आहे. डॉक्टर तसेच डायबिटीस असणारे लोक हा आंबा आता सध्या खरेदी करत आहेत.
थायलंडची नॉम डॉग माय व्हरायटी सगळ्यात चांगली असून मधासारखी गोड आहे. थायलंडमध्ये त्याचा TSH 16 परंतु आपल्याकडे 24 येत आहे. सीड लेस विना फायबर आणि 500 रुपये किलो प्रमाणे आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना परवडणारा आहे. हे आंबे भारतीय आंब्याच्या तुलनेत अधिक नफा मिळवून देणारी आहेत. भारतासह परदेशात याला मागणी असल्याने विक्री चांगली होते. होंग झू तैवानची व्हरायटी, एक्स सायंस सी, रेड यव्हरी, सिमोंग, पराहित, बनाना, परशिमन अशा विविध प्रकारच्या व्हरायटी आंबे हे लावले आहेत, अशी माहिती शेतकरी चंद्रकांत देशमुख यांनी दिली आहे.