TRENDING:

ड्रायव्हिंगपासून ड्रॅगनपर्यंत, बीडचा शेतकरी मालामाल, वर्षाला कमावतोय 11 लाखांचं उत्पन्न, VIDEO

Last Updated:

दिवसेंदिवस फळबाग लागवडीचे महत्त्व शेतकऱ्यांमध्ये प्रचलित होत आहे. काही वर्षांपासून टिळकांच्या शेतीचे महत्व अधिक प्रमाणात वाढलेला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रशांत पवार, प्रतिनिधी
advertisement

बीड - दिवसेंदिवस फळबाग लागवडीचे महत्त्व शेतकऱ्यांमध्ये प्रचलित होत आहे. काही वर्षांपासून ड्रॅगनच्या शेतीचे महत्त्व अधिक प्रमाणात वाढलेले आहे. ड्रॅगन शेतीच्या माध्यमातून शेतकरी भरघोस उत्पन्न मिळवतात. अगदी कमी क्षेत्रात लागवड करून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्याचा साधन म्हणून रागाने या फळाची पसंती वाढली आहे. आज अशाच एका प्रगतीशील शेतकऱ्याची कहाणी आपण जाणून घेणार आहोत.

advertisement

सुखदेव थेटे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. 36 गुंठ्यामध्ये ड्रॅगनची लागवड करून लाखो रुपयांची कमाई करणाऱ्या बीड येथील सुखदेव थेटे यांची कहाणी अत्यंत प्रेरणादायी आहे. सुखदेव थेटे हे ड्रॅगन लागवडीच्या आधी ड्रायव्हिंगचा व्यवसाय करत होते. त्यांनी ड्रॅगनसाठी ड्रायव्हिंगदेखील सोडली.

Gila Vada Recipe : अमरावतीमधील स्पेशल ‘गिला वडा’ कसा फेमस झाला? त्याची रेसिपी काय?, VIDEO

advertisement

त्यामुळे त्यांचा प्रवास हा ड्रायव्हिंगपासून ड्रॅगनपर्यंत राहिला असल्याचे म्हणावे लागेल. ड्रॅगन लागवडीसाठी त्यांना पाहिजे तेवढा घरच्यांकडून प्रतिसाद मिळत नव्हता. कारण ड्रॅगन फ्रुटबद्दल त्यांना विशेष अशी माहिती नव्हती. मात्र, त्यांनी जिद्दीच्या बळावर पुढे जायचा निर्णय घेतला. अगदी 36 गुंठ्यांमध्ये लागवड केलेले ड्रॅगनच्या शेतीची देखभाल करताना फवारणी करणे, त्याचबरोबर फळबागांसाठी आवश्यक अशा कामांची सुखदेव थेटे हे वेळोवेळी काळजी घेतात.

advertisement

नाकाला जीभ लावूनच दाखवली! पुण्यातील 76 वर्षांच्या आजोबांची गिनीज बुकात नोंद, VIDEO

आज ड्रॅगन या फळबागाच्या माध्यमातून ते अत्यंत चांगली कमाई करत आहेत. त्यांच्या कमाईबद्दल जाणून घेतले असता आज ते वर्षाला 10 ते 11 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत असल्याची माहिती त्यांनी लोकल18 शी बोलताना दिली. ड्रायव्हिंगपासून ड्रॅगनपर्यंतचा त्यांचा हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
ड्रायव्हिंगपासून ड्रॅगनपर्यंत, बीडचा शेतकरी मालामाल, वर्षाला कमावतोय 11 लाखांचं उत्पन्न, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल