मुंबई : महात्मा गांधी यांनी सांगितले होते की, भारताचा आधार हा शेतकरी आहे. आजही हे तितकेच खरे आहे. देशात कोट्यवधी शेतकरी आहेत, पण त्यांना पावसावर, सरकारी योजनांवर आणि अनेक गोष्टींवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी नवे मार्ग शोधणे खूप महत्त्वाचे आहे. असाच शेतीला जोड वेगळा प्रयोग करून बारामतीच्या पांडुरंग तावरे यांनी आपलं यश मिळवले. आणि नवीन ओळख निर्माण केली.
advertisement
नवीन प्रयोगाने बदललं आयुष्य
बारामतीजवळील शांगवी गावातील पांडुरंग तावरे हे रहिवासी आहेत. पांडुरंग एका संयुक्त कुटुंबात वाढले. घरात सर्वजण शेती करत होते. त्यांनी संगणकशास्त्राचा अभ्यास केला आणि जवळजवळ 20 वर्षे पर्यटन क्षेत्रात काम केले. नोकरी करत असतानाच त्यांच्या मनात एक विचार पक्का झाला. शेती आणि पर्यटन हे एकत्र आणता येईल का? असा प्रश्न पडला. आणि त्यांनी पूर्ण वेळ शेती पर्यटनासाठी काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे वडील त्यांना शेतीचे शिक्षण घ्यावे अशी इच्छा बाळगत होते. मात्रा उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी पांडुरंग गावात परतले.
कुटुंबाचा पाठिंबा मिळाला
नवीन सुरुवात करताना पांडुरंग यांना अनेक अडचणी आल्या. त्यांची पत्नी वैशाली शहरात वाढलेली असल्याने गावात राहणे तिच्यासाठी कठीण होते. पण हळूहळू तीच त्यांची सर्वात मोठी साथ आणि प्रोत्साहन बनली. पांडुरंग जेव्हा पर्यटन क्षेत्रात काम करत होते, तेव्हा त्यांचा पगार फक्त 470 रुपये होता. त्यामुळे गावात परतणे हा आर्थिकदृष्ट्या कठीण निर्णय होता, पण त्यांनी धाडस दाखवले.
कृषी पर्यटनाची पायाभरणी
युरोपमध्ये कृषी पर्यटन खूप लोकप्रिय होते. तीच कल्पना भारतात आणण्यासाठी पांडुरंग 2002 मध्ये गावात आले. 2003 मध्ये त्यांनी 2,440 लोकांवर एक सर्वेक्षण केले. त्यावर आधारित त्यांनी 2005 मध्ये एग्री टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (ATDC) सुरू केले. शहरातील लोकांना शेतकऱ्यांचे खरे जीवन अनुभवायला मिळावे आणि त्याच वेळी शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढावे. हा त्यामागचा हेतु होता.
आव्हाने आणि पहिली कमाई
पांडुरंग यांनी या सुरवातीला 6 लाख रुपये गुंतवले. पहिल्या वर्षी फारसा प्रतिसाद नव्हता. जाहिरात केली, पण पंधरा दिवस एकही फोन आला नाही. काही महिने तणावात गेले. शेवटी, ऑक्टोबर 2005 मध्ये पहिला ग्राहक मिळाला. पांडुरंग स्वतः गटाला शेत दाखवायला गेले, काम सांगितले, जेवण दिले. तो दिवस ते आजही विसरू शकत नाहीत. मग पुढील काही महिन्यांत, हजारो लोक शेताला भेट देऊ लागले. फक्त 18 महिन्यांत 13,000 पर्यटक येऊन गेले.
शेतकऱ्यांचे आयुष्य बदलले
नसरापूरमधील शेतकरी कृष्णा पडतारे सांगतात की, कृषी पर्यटनाशी जोडल्यावर त्यांचे उत्पन्न जवळपास पाच पट वाढले. त्याआधी त्यांनी कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय असे अनेक व्यवसाय केले पण फारसा फायदा झाला नव्हता. कृषी पर्यटनाने त्यांच्या आयुष्यात खरे बदल घडवले. आज पांडुरंग तावरे यांना ‘भारतात कृषी पर्यटनाचे जनक’ म्हणून ओळखले जाते. त्यांच्या एका कल्पनेने शेकडो शेतकऱ्यांचे जीवन बदलले, उत्पन्न वाढले आणि शहर-गाव यांच्यातील दरीही कमी झाली.
आज कोट्यवधी रुपयांचा टर्नओव्हर
पांडुरंग यांनी गेल्या काही वर्षांत 628 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना जोडले असून त्यांनी 58 कोटी रुपये मिळवून दिले आहेत.
